देशभरातील वंचित शेतकऱ्यांना आर्थिक सुविधा पुरवण्यासाठी एसबीआयचा अदानी कॅपिटलशी करार
मुंबई – 2 डिसेंबर – देशातील सर्वात मोठी कर्जपुरवठादार स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) अदानी कॅपिटल प्रायव्हेट लि. (अदानी कॅपिटल) या अदानी समूहाच्या एनबीएफसी विभागासह मास्टर करार केला आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी सह- कर्जपुरवठा केला जाणार असून त्याद्वारे शेती कामकाजाची कार्यक्षमता आणि पिकांची उत्पादनक्षमता वाढवली जाणार आहे.
या भागिदारीच्या मदतीने एसबीआयला देशाच्या दुर्गम भागातील, उपकरणांचा अवलंब करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना पिक उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मदत केली जाणार आहे. एसबीआय सक्रियपणे सह- कर्जपुरवठ्याच्या संधींचा शोध घेत असून शेती यांत्रिकीकरण, वेयरहाउस रिसीट फायनान्स, फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (एफपीओज) इत्यादींसाठी विविध एनबीएफसीबरोबर करार करत कर्जाचा प्रवाह दुप्पट करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची बँकेची योजना आहे.
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘सह- कर्जपुरवठा उपक्रमाअंतर्गत अदानी कॅपिटलबरोबर करार करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागिदारीमुळे एसबीआयला आपला ग्राहक वर्ग विस्तारण्यासाठी तसेच देशातील वंचित शेतकऱ्यांशी कनेक्ट करण्यासाठी व भारताच्या शेती अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मदत होईल. दुर्गम भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एनबीएफसीजबरोबर काम करत राहू आणि शेवटच्या टोकार्यंत बँकिंग सेवा देत राहू.’
अदानी कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, ‘भारतातील लघुउद्योजकांना वाजवी किंमतीत कर्ज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वंचित किंवा बँकिंग सेवांपासून दूर असलेल्या भारतीय शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून एसबीआयबरोबर भागिदारी केली आहे. या भागिदारीद्वारे शेती यांत्रिकीकरणासाठी योगदान देण्याचे आणि शेती क्षेत्रातील उत्पन्न व उत्पादनक्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’
आरबीआयने बँका आणि एनबीएफसीजसाठी प्रायोरिटी क्षेत्राद्वारे अर्थव्यवस्थेच्या वंचित आणि दुर्लक्षित वर्गाला होणारा कर्जाचा पुरवठा सुधारण्यासाठी तसेच कर्जदारांना वाजवी किंमतीत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सह- कर्जपुरवठ्याची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सह- कर्जपुरवठ्याची ही पद्धत कर्जदारांना सर्वोत्तम व्याज मिळवून देते