पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मध्ये महिलेला सर्वोच्च प्राधान्य दिले. शत्रूच्या महिलेचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मान केला. शत्रूशी लढाई करताना सुद्धा त्यांनी कधीही महिलेचा अवमान केल्याची इतिहासामध्ये नोंद नाही. याउलट शत्रूंनी महिलांचा अनादर केला, छळ केला… याची नोंद आहे. शिवरायांनी मात्र या विरोधात कठोर शासन करून महिलांवर अन्याय – अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन केले. जिजाऊंची तशी शिकवणच शिवरायांना होती. आज महाराष्ट्रासह देश सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जात आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांना जाळून मारले जात आहे, ही महाराष्ट्राच्या विचारांना काळिमा फासणारी गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुणांनी व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा अभ्यास करून शिवचरित्राचा जागर करून समाजाचं प्रबोधन करत प्रत्येकाने शिवचरित्र अंगीकारले पाहिजे. महिलांचे संरक्षण करून यांना प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च सन्मान दिला पाहिजे. हीच खरी शिवरायांची शिकवण आहे… असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.आज पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने धनकवडी, भारती विद्यापीठ, के के मार्केट परिसर, लाल महाल, एसएसपीएमएस शिवाजी महाराज पुतळा, गोकुळ नगर कात्रज, किल्ले रायरेश्वर, किल्ले शिवनेरी इत्यादी ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.’छत्रपती शिवाजी महाराज की जय…, जय जिजाऊ, जय शिवराय…, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण भारतीय विद्यापीठ परिसर व धनकवडी भाग घोषणांनी दणाणून गेला होता.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंना आदर्श मानले आणि राज्यकारभार केला आपणही त्याच जिजाऊ-सावित्री-अहिल्या च्या महाराष्ट्रात राहतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. हिच खरी शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल आणि शिवजयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.’ असे संतोष शिंदे म्हणाले.
पेढे वाटून संभाजी ब्रिगेड कडून शिवजयंती साजरी…
पहाटे साडेपाच वाजता सुप्रभात योगा व संभाजी ब्रिगेडच्या वतीने धनकवडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पेढे वाटून साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकररावांना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संयोजक – संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे, भिकाजी साळुंखे, बळीराम धोपटे, सुहास भोईटे, विकास तावरे, विलास खोपडे, संभाजी गरुड, सुनील भालेराव, प्रफुल्ल कुंभार सुरेश गोळे, अशोक वाळुंजकर मुकुंद गुरव, सचिन सूर्यवंशी, सुषमा साळुंखे, शालिनी शिंदे, सुरेखा तावरे, शोभा नलवडे, अलका काळे, सदानंद सोनवणे, खैरे सर, योग शिक्षक गरुड सर, मोरे सर, थोरात सर, डॉ. विक्रांत पाटील, नारायण पाटील, महादेव मातेरे, पंढरीनाथ सोंडकर, राहुल टेंगळे, सपना माळी, विनोद बिबवे आदी उपस्थित होते.दिपोत्सवा वेळी… माजी नगरसेवक आप्पा रेणुसे, बाबा शिंदे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, उदय जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकराव पाटील, बळीराम थोपटे, विश्वास भोईटे, सुनील भालेराव, भिकाजी साळुंखे, डॉ. मुळीक, महादेव मातेरे, अमोल निंबाळकर, संभाजी गरुड आदी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.