‘सरस्वती प्रसाद’ होणार पुणेकरांसाठी खुले

Date:

पुणे – सिंधू संस्कृतीच्या अभ्यासिका डॉ. मालती जनार्दन शेंडगे यांनी ‘सरस्वती प्रसाद’ ही नवी पेठेतील सुमारे पाच कोटी रुपयांची वास्तू डेक्कन एज्युकेशन सोसायटीला देण्याची ईच्छा त्यांच्या मृत्यूपत्रात व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची देखभाल करणार्‍या उल्हास जोशी यांनी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांशी या संदर्भातील कायदेशीर व्यवहार नुकताच पूर्ण केला. त्यामुळे इतिहास, भाषा, पुरातत्व शास्त्र आणि संस्कृतीची माहिती देणारे अडीच हजार संदर्भग्रथाचे ग्रंथालय पुणेकरांसाठी खुले होणार आहे.
दत्तात्रय वाडेकर पेशाने शक्षक होते. पै-पै एकत्र करून शंभर वर्षांपूर्वी त्यांनी अडीच हजार चौरस ङ्गूटांची ही वास्तू उभी केली. सात खोल्या असणार्‍या या वास्तूत सुरुवातीपासूनच ग्रंथ संपदेच्या रुपाने सरस्वतीचा प्रसाद होता. त्यांचे चिरंजीव प्रा. रंगनाथ यांनी इतिहास, भाषा, पुरातत्व शास्त्र आणि संस्कृती आदी विषयांच्या पुस्तकांनी ही ग्रंथसंपदा समृध्द केली.
त्यांनी हा अनमोल ठेवा त्यांच्या शिष्या आणि सिंधू संस्कृतीच्या संशोधिका मालती जनार्दन शेंडगे यांना बक्षिस म्हणून दिला. डेक्कन कॉलेजचे डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत नुकताच हा ठेवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, संचालक किरण शाळिग्राम, डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, डॉ. अशोक वाडेकर, सुभाष करमरकर, बकुळ पंडीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. कुंटे म्हणाले, ‘मालती शेंडगे या सिंधू संस्कृतीच्या अभ्यासिका होत्या. सिंधू संस्कृतीची लिपी असल्याचे महत्वपूर्ण संशोधन त्यांनी केले. जपानमध्ये त्यांनी बुध्द धर्माचा अभ्यास केला. १९८२ पासून त्या भारतात परत आल्या. त्यांनी केलेले संशोधनात्मक कार्य बहुमूल्य आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचे इच्छेनुसार ‘सरस्वती प्रसाद’ डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. येथील ग्रंथसंपदा दुर्मीळ आहे. त्याचे आम्ही जतन करणार आहोत. आवश्यकतेप्रमाणे डिजिटलायझेशन करण्यात येईल. अभ्यासकांना उपयुक्त ठरतील अशा या विषयातील महत्वाच्या ग्रंथांचा नव्याने समावेश करता येईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही ग्रंथसंपदा सर्वांसाठी खुली केली जाणार आहे.’
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...