संकटातील चिपळूणसाठी पुणेकरांचे “मिशन जलदूत”
पुणे- पूरामुळे वाताहात झालेल्या चिपळूण बद्दल आपण रोज ऐकतोय, पाहतोय. ही सगळी दृष्ये पाहून प्रत्येक जण अस्वस्थ होतोय. याच अस्वस्थतेतून आणि चिपळूणला सहकार्याच्या भूमिकेतून सामान्य पुणेकरांनी वंदेमातरम् संघटनेच्या माध्यमातून “मिशन जलदूत” हाती घेतले आहे.
गेले चार दिवस वंदेमातरम् संघटना सातत्याने चिपळूणच्या संपर्कात आहे. या संपर्कातून असे निरीक्षण आले आहे की चिपळूणला आता सर्वाधिक गरज पिण्यायोग्य पाण्याची आहे. पुढील किमान ३ आठवडे तरी चिपळूणला पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार नाही असे चिपळूण मधील स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच आपत्कालीन कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या वंदेमातरम् संघटना, युवा फिनिक्स सोसायटी, टीम सरसेनापती हंबीरराव, विविध गणेशोत्सव मंडळे, ढोलताशा पथके, विविध कलाकार यांच्या माध्यमातून पुणेकरांच्या वतीने चिपळूणला १,००,००० (१ लाख) पाण्याच्या बाटल्या पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पाण्याच्या बाटल्यांसोबतच चादरी, रेनकोट, ताडपत्री इत्यादी आवश्यक वस्तू देखील पाठविण्यात येणार आहेत.
या “मिशन जलदूत” मध्ये जलदूत म्हणून सहभागी होण्याचे आवाहन पुणेकर नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
आपण जलदूत म्हणून कसे सहभागी होऊ शकता
१) पुणे शहरात “वृध्देश्वर सिध्देश्वर मंदीर, सावरकर भवन शेजारी, कॉंग्रेस भवन समोर” आणि “विणकर सभागृह, पद्मावती, चव्हाण नगर जवळ” या दोन ठिकाणी यथाशक्ती पाण्याच्या बाटल्या आणून द्याव्यात किंवा
२) कोटेशन पध्दतीने काढलेल्या खर्चाच्या अंदाजानुसार १२ बाटल्यांचा एक बॉक्स ७२/- रुपयांना उपलब्ध आहे. तर ७२/- रु किंवा त्या पटीतील आपली देणगी ९८९०७९८९०३ किंवा ९९२१६९३१७५ या क्रमांकांवर गुगल पे/ भिम पे करावी.
वरील सर्व जमाखर्च मिशन पूर्ण झाल्यावर नेहमीप्रमाणे सोशल मिडीयावर देण्यात येइल.
या सोबतच आपल्याला वापरण्यायोग्य चादरी, गोधडी, ताडपत्री , बिस्किट पुडे या गोष्टी द्यायच्या असतील तर त्यादेखील आपण वर नमूद केलेल्या केंद्रांवर देऊ शकता.
आपल्याला कमीतकमी वेळात तब्बल १,००,००० पाण्याच्या बाटल्या आपल्या चिपळूणवासीयांपर्यंत पोहचवायच्या आहेत. त्यामुळे किमान १ बॉक्स पाण्याच्या बाटल्या देऊन या मिशन जलदूत मध्ये “जलदूत” म्हणून सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
त्याचबरोबर हा उपक्रम जास्तीतजास्त जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून पण आपण जलदूत बनून चिपळूणला सहकार्याचा हात देऊ शकता.
मिशन जलदूत बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क:
९८९०७९८९०३,९९२१६९३१७५ , ७८७५८२०४३२ ७०५७२१७२२९