मुंबई, दि. २१ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आज मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते.
नोव्हेंबर १९५५ पासून संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ऐतिहासिक लढा उभारण्यात आला. या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. हुतात्म्यांचा त्याग, संघर्ष आणि बलिदान यामुळेच आज महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानाचे स्मरण प्रत्येक महाराष्ट्रवासीयाने सदैव अभिमानाने केले पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

