पुणे- सन १९९३ साली अॅपल सॅलाॅनची सुरूवात झाली. नयना चोपडे यांनी स्थापन केलेल्या सॅलाॅनला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त स्कीन अॅण्ड हेअर केअरचे नवे उत्पादन बाजारात उपलब्ध होत आहे. या उत्पादनाचे उद्घाटन अभिनेता महेश मांजरेकरयांच्या हस्ते झाले. तसेच लीला पूनावाला फाऊंडेशनच्या संस्थापिका पद्मश्री लीला पूनावाला, मिसेस महाराष्ट्रा शिल्पा ओझा देखिल ह्या वेळी उपस्थित होत्या. महिला सबलीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण ठरू शकते. सर्व कर्मचारी, फ्रन्चायजीज आणि ग्राहक उपस्थित होते.
चोपडा यांनी २५ वर्षांपूर्वी जुन्या पद्धतींविरूद्ध लढा देऊन सौंदर्य क्षेत्रातील व्यवसायास सुरूवात केली. प्रत्येकजण आतून सुंदर असतो यावर त्यांचा विश्वास असून ती सुंदरता बाहेर आणण्याची गरज असते.
यावेळी पद्मश्री पूनावाला म्हणाल्या, ‘’नयाना यांनी केलेले काम कौतुकास्पद असून उद्योजक महलांसाठी एक आदर्श उदाहरण आहे.’’
प्राची यांनी आंतराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग घेतले असून सिडेस्कोचे हेअर अॅण्ड ब्युटी प्रमाणपत्र मिळाले आहे. हेअर अॅण्ड केमिकल्सचे विदाल ससून अकॅडमी आणि लाॅरियलचे प्रशिक्षण घेतले आहे. प्राची व्यवस्थापकीय आॅपरेशन्स पाहत असून एफआयएलएलटी येथे प्रशिक्षण देते. प्राची म्हणाल्या, येथे काम करत असताना खूप मजा येते. मी माझ्या कौशल्याला येथे खूप चांगल्याप्रकारे चालना देऊ शकते.
नयाना यांना निम शहरी महिलांवर विश्वास असून त्यांनी स्वतंत्रपणे कामास सुरूवात केली तर देशाच्या प्रगतीला हातभार लागेल असे त्या म्हणाल्या. त्यासाठी एफआय़एलएलटीची स्थापना केली असून स्त्री-पुरूषांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देणे हा त्यामागील हेतू आहे. जेणेकरून या व्यवसायाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होईल.
चोपडे यांनी काही योजनांची आखणी केली आहे. त्या म्हणाल्या, ‘’संपर्ण राज्यात आणि देशभरात सलूनची शाखा उघडण्याचे ध्येय अाहे. जेणेकरून स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचेल. सध्या १० शाखा असून २०२० पर्यंत १०० शाखांची स्थापना करण्याचे ध्येय आहे.’’