पुणे- पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या पाहता त्यांना पडणाऱ्या अपुऱ्या वैद्यकीय सेवा,वेळेवर बेड न मिळणे ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर बेड ची कमतरता आदींची परिस्थिती पाहता आज आर.पी.आय च्या (आठवले गट) शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. तसेच महापालिकेच्या वॉररूमची पाहणी केली.लसीकरण आणि इतर अनुषंगिक बाबीवर सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा केली. व नागरिकांच्या अडचणी त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.ज्यादा बेड वाढविण्यात यावेत,दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा ऐवजी दुपारी दोन वाजेपर्यंत वाढविण्यात यावी.कोविड हॉस्पिटल मध्येच ऑक्सीजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात यावेत. वॉररूम मधून सर्व अद्यावत माहिती लोकांना मिळेल अशी यंत्रणा राबविण्यात यावी.ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली आहे त्यांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जावा आणि व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावेत इ.सूचना शिष्टमंडळाने केल्या.
या वेळी प्रशासनाचे रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्या साठीचे प्रयत्न आणि त्यामध्ये असणाऱ्या अडचणीची महिती तसेच पुण्यात आणखी तीन चार कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू केले आहे.तेथे ऑक्सीजन प्लांट देखिल उभारण्यात येणार आहेत. पाहिला डोस दिलेल्याना दुसऱ्या डोसला प्राधान्य देऊ,वॉररूम अद्यावत माहितीसह काम करतील, व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात येतील आणि ऑक्सीजन पुरवठा वाढल्यास ऑक्सीजन बेड देखील वाढविण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.
यावेळी उपमहापौर सुनिताताई वाडेकर,मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे,आरपीआय चे शहर अध्यक्ष संजय सोनवणे,बाळासाहेब जानराव,परशुराम वाडेकर,ॲड.मंदार जोशी,मोहन जगताप,ॲड.आयुब शेख,अशोक शिरोळे,बसवराज गायकवाड,श्याम सदाफुले,दादाभाऊ वारभूवन,अविनाश कदम,राजेश गाडे,सुशील सर्वगोड इ.उपस्थीत होते