बंडखोर आमदार दुपारी गुवाहाटी सोडणार,गोव्यात ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये 71 खोल्या बुक

Date:

रात्री फडणवीसांचे पत्र -सकाळी राज्यपालांचे मविआ सरकारला आदेश- उद्याच बहुमत चाचणी घ्या

मुंबई-शिवसेनेतून वेगळा पडलेला एकनाथ शिंदे यांचा गट सर्व आमदारांसह आज गुवाहाटीतून महाराष्ट्रात न येता गोव्यात जाणार आहे. गोवा येथील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये आमदारांसाठी 71 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात राज्यपालांनी उद्या म्हणजेच 30 जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आमदार गुवाहाटीतून मुंबईत न येता गोव्याला जात आहेत. 30 जून रोजी सकाळी 11 वाजताच फ्लोअर टेस्टसाठी अधिवेशन बोलावलेलं आहे. यामुळे ऐनवेळी अडचण नको म्हणून शिंदे गटाने गोवा राज्यात आज उतरण्याचं ठरवलेलं दिसते आहे. गोव्यातील ताज कन्व्हेशन हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी 71 खोल्या बुक करण्यात आल्या असून येथूनच हे आमदार बहुमत चाचणीसाठी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे बुधवारी सकाळी गुवाहाटीमध्ये माध्यमांना म्हणाले की, आम्ही 40+10 आमदार आहोत. आम्ही उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईला जाणार आहोत. 2/3 पेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत काय, होईल हे सर्वश्रुत आहे.

बहुमत चाचणीविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या अधिवेशनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे. यामुळे यानंतरच बहुमत चाचणी होईल की नाही, हे स्पष्ट होईल.

मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथून ते सायंकाळी मुंबईत पोहोचले आणि आमदारांसह राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस राजभवनाबाहेर म्हणाले- उद्धव सरकार अल्पमतात आहे, बहुमत सिद्ध करावे.

शिंदे यांच्यामागील महासत्ता समोर आली – काँग्रेस
फडणवीस राजभवनात पोहोचताच राज्‍यात काँग्रेस आक्रमक झाली. पक्षनेते सचिन सावंत म्हणाले- एकनाथ शिंदे यांच्यामागील महासत्ता समोर आली आहे. प्रत्यक्षात 24 जून रोजी गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सांगितले की, आमच्याकडे महासत्ता आहे, उद्धव सरकार पडेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...