रमामाई आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी महापौरांना इशारा ( व्हिडीओ रिपोर्ट )

Date:

पुणे- संभाजी बागेतील गडकरींच्या पुतळ्याचे आव्हान समोर असताना , नाशिक मधील वक्तव्य माध्यमांमध्ये गाजलेलं असताना आता पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी इशारा देण्यात आला आहे . कॉंग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे तसेच नगरसेविका लता राजगुरू आणि रमामाई आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी हा इशारा दिला आहे . अर्थात महापालिका प्रशासनाने मात्र या इशाऱ्यानंतर महापौरांना अडचणीत येवू न देण्याची खबरदारी घेत रमामाई पुतळ्याच्या प्रस्थापनेसाठी तयारीचा सूर दाखविला आहे .
अरविंद शिंदे, लताताई राजगुरू आणि विठ्ठल गायकवाड यांनी आज महापौर मुक्ता टिळक , उपमहापौर नवनाथ कांबळे , आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची भेट घेवून हा खणखणीत इशारा दिला . कोणत्याही परिस्थितीत रमामाई यांचा  पुतळा २७ मी या रमामाईंच्या ८२ व्या पुण्यतिथी दिनीच प्रस्थापित व्हायला हवा अशी भूमिका घेत , ‘तुम्ही ते काम करा अन्यथा आम्ही ते काम करू’ असा इशारा दिला आहे .
वाडिया कॉलेज जवळील रमामाई आंबेडकर उद्यानानजिक हा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चौथरा फेब्रुवारीतच बांधून पूर्ण झाला आहे आणि, रमामाईंचा पूर्णाकृती पुतळा ३ फेब्रुवारी २०१५ रोजीच स्मारक समितीने तत्कालीन महापौर दत्ता धनकवडे यांच्या स्वाधीन केला आहे . ..पहा हा छोटासा व्हिडीओ रिपोर्ट…

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वरुणराजा ऐकेना..धरणात पाणी साठेना…

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील चारही...

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक अन्यथा गय करणार नाही- तुकाराम मुंढे

मुंबई-राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने...

वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वंकष नियोजन- अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर

पुणे- आगामी आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या...