पुणे-काँग्रेस नेते, खासदार, राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पूर्व पुण्यातील “वडगाव शेरी” विधानसभेत गरजू माता-भगिनींना व तृतीयपंथीयांना या कोरोनाच्या संकट काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशात त्यांना निदान पुरेसे “राशन किट” देऊन एक छोटी मायेची शिदोरी राहुल शिरसाट, अभिजीत साळवे व युवक काँग्रेसच्या वतीने मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त आज देण्यात आली.
या उपक्रमाला प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, राजेंद्र शिरसाट-माजी नगरसेवक नारायण गलांडे, अमीर शेख- विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष, सतीश मुळीक, युनूस शेख – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निलेश मस्के – अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती पुणे, ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, विल्सन चंदेलवाल, संकेत गलांडे, विठ्ठल गायकवाड, ललिता जगताप आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत साळवे, पुणे शहर चिटणीस – युवक काँग्रेस यांनी केले होते.