Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तरुण पिढीने कीर्तन परंपरेला आपलेसे करावे – ह भ प सौ ताराबाई देशपांडे

Date:

पुणे-माणसांनी अशी कार्ये करावी की त्याची कीर्ती सौंदर्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असेल चांगली कीर्ती पसरावी या साठी प्रत्येकाने काम करीत राहिले पाहिजे तरुण पिढीने देखील चांगल्या कामातून कीर्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे आणि त्यासाठी कीर्तनासारख्या चांगल्या परंपरेला आपलस केलं पाहिजे असे विचार जेष्ठ कीर्तनकार ह भ प सौ ताराबाई देशपांडे यांनी आज व्यक्त केले. कीर्तन कलानिधी ह भ प कै डॉ अनंतबुवा मेहेंदळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा ‘अनंत स्मृती कीर्तन पुरस्कार २०१८ ‘स्वीकारताना त्याबोलत होत्या . रोख रक्कम , स्मृत्चीन्हा ,सन्मानपत्र ,वस्त्र आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे२६ वे वर्ष होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कीर्तनकार ह भ प रामचंद्रबुवा गोऱ्हे हे होते . भिकारदास मारुती मंदिरा जवळीलनारद मंदिर येथे सलग ३ दिवस चाललेल्या कीर्तन कला निधी ह भ प कै डॉ अनंतबुवा मेहेंदळे यांच्या अनंत स्मृती कीर्तनमहोत्सवाच्या सांगता समारंभात भाविकांनी मोठी गर्दी केली होती
गोव्यामध्ये कीर्तन कला निधी ह भ प कै डॉ अनंतबुवा मेहेंदळे यांनी’नारदीय कीर्तन विद्यालय’ स्थापन करून कीर्तन परंपरेचा
प्रसार व्हावा यासाठी ते आयुष्यभर झटले याचा उल्लेख करून जेष्ठ कीर्तनकार ह भ प सौ ताराबाई देशपांडे म्हणाल्या की , गोव्यातीलनारदीय कीर्तन विद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करताना कीर्तन परंपरा फुलावी , बालवयापासूनच कीर्तनाचे संस्कार व्हावेतयासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत . ह भ प कै भा रा घैसास यांचे शिष्यत्व पत्करून कीर्तन विद्येचे शिक्षण घेतअसतानाच कीर्तन कला निधी ह भ प कै डॉ अनंतबुवा मेहेंदळे यांनी दिलेल्या ज्ञानाचा देखील माझ्या आयुष्यात प्रभाव पडला, आजदेखील संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तनकारांना मानाचे स्थान आहे, कीर्तन परंपरा पुढे चालू राहावी त्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था प्रयत्नकरीत आहेत या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी युवती कीर्तनकर तन्मयी मेहेंदळे यांनी इशस्तवन केले . हरी कीर्तानोतेज्जक सभेचे सचिव ह भ प
नंदकुमार मेहेंदळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले . आभारप्रदर्शन नम्रता मेहेंदळे यांनी केले . या नंतर ह भ प सौ तारा देशपांडेयांचे ‘;त्यागिता हा देह- मयुरध्वज’या विषयावर कीर्तन झाले.त्या आधी या महोत्सवाच्या प्रथम दिवशी दि २२ एप्रिल रोजी गोव्याचे कीर्तनकार ह भ प मनोहरबुवा जोग यांचे ‘काम क्रोधसोडोनी द्यावा- तीमिन्गल’ या विषयावर कीर्तन झाले. ‘प्रत्येक व्यक्तीने निर्माण होणार्या अहंकारापासून विचारपूर्वक दूर राहिला हवेव आयुष्यात संयमाला सदैव महत्व द्यावे त्यातूनच व्यक्तीची प्रगती हो’असे ते म्हणाले . या महोत्सवाच्या दुसर्या दिवशी दि २३एप्रिल रोजी कीर्तन विशारद ह भ प निवेदिता मेहेंदळे यांचे ‘शक्ती हि देवता- मंत्राद्ष्टा विवेकानंद’ या विषयावर कीर्तन झाले.
शक्तीची अनेक रूपे असून स्त्रीने आपल्यातील उर्जारूपी शक्तीने साऱ्या समाजाला सदैव चांगल्या विचारांची व चांगल्या कृतीचीप्रेरणा द्यावी असे त्यांनी कीर्तनात सांगितले . तीन दिवसांच्या या कीर्तन महोत्सवात नचिकेत मेहेंदळे (तबला) हेमंत गोडबोले(तबला) ,गजानन देशपांडे (हार्मोनियम), ईशान मेहेंदळे (टाळ)यांनी साथसंगत केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...