शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Date:

नवी दिल्ली-नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच जंतरमंतर येथे जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो नुकतेच समोर आले असून, राजकीय वर्तुळात या बैठकीची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. काल शरद पवार यांनीही स्वतः जंतरमंतरवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर लगेचच आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत काही चर्चा झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान, या भेटीचे फोटो समोर आले असले तरी, ही भेट जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाली की ही केवळ एक सदिच्छा राजकीय भेट होती, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, दिल्लीत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि तापलेल्या वातावरणात शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“सरकारचा माज उतरवावा लागेल,जंतरमंतर सोडू नका:वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मराठा...

CJPचे आंदोलन, दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद:बंगालहून 2 हजार CRPF जवान दिल्लीला रवाना

CRPF च्या 20 तुकड्या बंगालमधून दिल्लीला विमानाने हलवल्या; 2...

युवक काँग्रेसचे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आंदोलन

पुणे-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर...

विद्यार्थ्यांवरील अत्याचार पाहून माझे रक्त खवळतेय; लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत : नसीरुद्दीन शाह

जंतरमंतरवरील आंदोलकांवरील कारवाईचा तीव्र निषेध; भावूक होत विद्यार्थ्यांना दिला...