उत्सवाच्या जागरात कन्यापूजन

Date:

पुणे नवरात्रौ  महोत्सवात कन्यापूजन उत्साहात 
पुणे-  नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. या उत्सवात कन्यापूजनाला अग्रस्थान आहे.. या उत्सवात कुमारिका पूजनाला  महत्व असल्याने, आजही नवरात्रानिमित्त कन्यापूजन करून परंपरेचे जतंन  केले जाते. पुणे नवरात्रौ  महोत्सवातही मोठ्या थाटा माटात विधीवत कन्यापूजन करून स्त्री शक्तीला नमन करण्यात आले . 
           पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या वतीने कै वसंतराव बागुल उद्यानाजवळील श्री लक्ष्मीमाता मंदिरात विविध स्पर्धा, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . उत्सवात स्त्रियांचा यथोचित गौरव करण्यासाठी कन्यापूजन आयोजित करण्यात आले होते . फुलांनी,विद्युतरोषणाईने सजवलेल्या मंडपात. कन्यापूजन संपन्न झाले भारत माता कि लक्ष्मीमाताकी जयजयकार करून पूजनास सुरुवात करण्यात आली.
             ललिता पंचमीनिमित्त आयोजित कन्यापूजनात दरवर्षी दोन ते तीन हजार मुली सहभागी होतात. या वर्षीही पूजनास अवघ्या सहा महिन्याच्या मुलींपासून बारा वर्ष वयोगटातील मुली सहभागी झाल्या कार्यक्रमात महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, जयश्री  बागुल व बागुल परिवारातील सदस्यांच्या हस्ते सहभागी प्रत्येक मुलीची पाद्य पूजा करून त्यांचा शृंगार आणि नंतर त्यांचे औक्षण केले गेले . या प्रत्येक  मुलीस देवी मानून त्यांच्या पायी नातमस्तक  होऊन त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली . तसेच मुलींना दैनंदिन वापरासाठी उपयोगी पडतील अश्या भेट वस्तू देण्यात आल्या बिस्किटे, लाडू, चिप्स हा आवडीचा खाऊ देऊन त्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. 
                कन्या पूजनाच्या निमिताने  निरामय ग्रुप या सामाजिक संस्थेच्या लहान मुलींनी मंगळागौर कार्यक्रमाचे  सुरेख सादरीकरण केले. पारंपरिक खेळांचा बाज असलेले सुंदर खेळ मुलींना माहित व्हावे. या साठी या मुलींनी हे खेळ सादर केले. यात सईबाईंचा कोंबडा, गाठोडं, घोडा, सासू सुनेचा भांडण, खडकावरच झुळझुळ पाणी, पद्मासन फुगडी, शिवाई रानफुले ताक काढू, धुणं,  नववारी,नाकात नाथ अशा पारंपरिक वेशातील खेळांचे सादरीकरण सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले. 
               कार्यक्रमाच्या सादरीकरणातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे. मुलगा मुलगी एक सामान दोघांना हि शिकऊ छान, भ्रूण हत्त्या करू नका… पारंपरिक खेळातून ,आधुनिक संदेश यावेळी महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आले. 
                  या देवी सर्वभुतेषु शक्ती रूपेण संसंस्थिता 
                   नमसात्स्ये नमो  नमः  
अर्थात या भूतलावर देवी शक्तीरूपात विराजमान आहे. म्हणून नवरात्रीत स्त्री रूपाची पूजा केली जाते. देवी भागवत पुराणातही कन्यापूजनाचे महत्व सांगण्यात आले आहे. कन्यांना देवीरूप मानून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. या प्रथेचे पालन केले जाते. देवी हि मांगल्याचे प्रतीक आहे. तिच्या पूजनाने सर्व मंगल होते, अशी श्रद्धा आहे, देवीकडून इष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी तिच्या रूपांची पूजा केली जाते . महिला महोत्सवातही सर्व धार्मिक विधींसह कन्यांचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर प्रत्येक कन्येस आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. तसेच लकी ड्रॉ करण्यात आले. प्रथम, व्दितीय , तृतीय  क्रमांकसाठी अनुक्रमे सायकल, स्टडी टेबल , घड्याळाचे तसेच चार उत्तेजनार्थ बक्षिसाचे वाटप करण्यात आले.  आबा बागुल,जयश्री बागुल, निर्मला जगताप,योगिता निकम, सौ खलाटे,रेखा झानपुरे विधूलता साळी , कालिंदी भोसले, छाया कातुरे  आदी यावेळी उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....