पुणे फेस्टीव्हलममधील बॉक्सिंग स्पर्धेचा विजेता ठरला केदार

Date:

पुणे – लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग केंद्रात आज २९ व्या पुणे फेस्टिव्हलने आयोजित करण्यात आलेल्या बॉक्सिंग
स्पर्धेतील खुल्या गटाचे विजेतेपद केदार नांगरे याने मिळवत बेस्ट बॉक्सरचा किताबही मिळवला. खुल्या गटातील
पराभूत होऊनही चांगला खेळ केल्याबद्दल किरण तांडेलकर याला बेस्ट लुझरच्या किताबाने गौरवण्यात आले. महाराष्ट्र
पोलिस दलाच्या टीममधील तांडेलकरसह पाच खेळाडूंनी स्पर्धा गाजवली.
या स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पुणे शहर, जिल्हा
आणि महाराष्ट्र पोलिस दलाच्या टीमसह खुल्या गटात एकूण ५६ खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी बॉक्सिंग
असोसिएशनचे सेक्रेटरी मदन वाणी, संघटनेचे इतर पदाधिकारी, अधिकारी आणि पंच तसेच विविध क्लबचे खेळाडू
उपस्थित होते.
दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची संख्या वाढत असून यंदाच्या स्पर्धेत बारामतीसह पुणे शहर आणि
जिल्ह्यातील सुमारे १० क्लबचे खेळाडून सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलाच्या टीममधील किरण तांडेलकर
बेस्ट लुझर ठरला तर सागर पगारे, संतोष सुरवडे, सागर भोईटे आणि अमोल सावंत यांनीही विजय संपादन केला.
खुल्या गटात ४६ ते ९१ किलो वजनाच्या गटात लढती झाल्या. त्यात ७० किलो गटातील केदार नांगरे बेस्ट बॉक्सर
ठरला तर ६० किलो गटातील किरण तांडेलकर बेस्ट लुझर ठरला. अन्य गटातील विजेत्यांची नावे अशी, केदार नांगरे,
विवेक यादव, राम लंके, अमेय कळंबे, शॉन भोरकरे, कुंदन पांडे, गौरव गोसावी, वैभव कंक, गौगव पेंडार, रोहित चव्हाण,
पृथ्वीराज कदम, शुभम कदम, यश खानेकर, केदार नांगरे, अर्पित परदेशी, चिन्मय तिडके, तुषार दलाल यांना सुवर्णपदक
देऊन गौरविण्यात आले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी याचे संयोजन केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...