पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

Date:

पुणे, 3: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरग यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नाशिकमधील नांदगाव हे त्यांचे मूळगाव, तर औरंगाबादला त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले. प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. बीड, परभणी, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे ते अधिकारी वर्गासोबतच पत्रकारांमध्ये खूप लोकप्रिय होते.
राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचाही छंद होता. अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिक तसेच दिवाळी अंकांमधून त्यांची व्यंगचिञ प्रसिद्ध होत असत. बालगंधर्वला त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरले होते.
गेल्याच आठवड्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. ससून रुग्णालयाच्या आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वत: डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. सोबतच उपमुख्यमंत्री कार्यालय, आरोग्य मंत्री कार्यालय सातत्याने उपचाराबाबत विचारपूस करत होते. त्यानुसार डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत होते.
उपमुख्यमंञी अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनिल अंबानींना अटक का नाही ? सर्वोच्च न्यायालयात सवाल

नवी दिल्ली- ४०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे सूत्रधार असूनही...

आजपासून कमर्शियल गॅस सिलिंडर 993 रुपयांनी महाग

ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियमही लागू; मे महिन्यात होणारे 4...

आईमाता मंदिरासमोर लिक्विड हिट केमिकल पीपलच्या गोदामातून क्लोरीन गळती:२२ नागरिक उपचारासाठी ससूनमध्ये

पुणे: मार्केट यार्डमधील गंगाधाम चौक ते बिबवेवाडी रस्त्यावरील एका...

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...