खंडणी प्रकरणात “पोलिसमित्र’ कासटला कोठडी

Date:

पुणे – खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला “पोलिसमित्र’ जयेश भगवानदास कासट (वय 42, रा. एरंडवणे) याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरातील एका डॉक्‍टरकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कासट याच्याविरुद्ध डॉ. हेमंत अडसूळ (वय 55, रा. सहकारनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून शनिवारी (ता. 15) रात्री त्याला अटक करण्यात आली. फिर्यादीचा भाऊ मनोज अडसूळ याने डॉ. दीपक रासने यांच्या मुलाला विनयभंग, ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 75 लाख रुपये घेतले होते.

तसेच, उर्वरित 70 लाखांची मागणी करीत होता. पैसे घेतल्याबाबत त्याने डॉ. रासने यांना सांगितले नव्हते. याप्रकरणी प्रारंभी मनोज अडसूळने पोलिसांकडे खंडणीची तक्रार दिली होती. पोलिसांच्या तपासात अडसूळनेच खंडणी उकळल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर डॉ. अडसूळ याने शनिवारी कासटविरुद्ध फिर्याद दिली. त्यानंतर खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाने कासटला अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी कासटला रविवारी न्यायालयात हजर केले. त्याने अडसूळकडून घेतलेली पाच लाखांची खंडणीची रक्कम जप्त करायची आहे, तसेच या प्रकरणात त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, यादृष्टीने तपास करायचा आहे, त्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फिर्यादीतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांना रुपाली पाटलांनी घातले साकडे

पुणे-राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला...

‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव पुणे : साडेतीन...