पुणे-राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानांतर्गत कर्मवीर व योगाचार्य डॉ. प्रल्हाद वडगांवकर यांनी लेखन केलेले आणि ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस व प्रा. श्रावण देवरे यांच्या प्रस्तावना लाभलेल्या “झपाटलेला ओबीसी बलुतेदार” या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, “घरच्या घरी करण्याजोगे आरोग्य रक्षक सोपे उपचार” या ग्रंथाचे प्रकाशन न्युरो सर्जन एस हॉस्पिट चे प्रमुख डॉ. सुरेश पाटणकर आणि “सप्तरंग काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ऑल इंडिया जैन समाजचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारीया, माजी न्यायमूर्ती मान्धाता झोडगे, ओबीसी संघटना प्रमुख डॉ. पोपट कुंभार, मोहन देशमाने, प्रताप गुरव, लक्ष्मण सुपेकर, नंदकुमार गोसावी आदी उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, आम्ही डॉक्टर जरी असलो तरी प्रत्येक गोष्टीसाठी पेशंटने डॉक्टरकडे जाऊ नये .पूर्वी आपण आजीचा बटवा उपयोग करीत होतो. यापुढे सर्वांनी डॉ. वडगांवकर यांचे पुस्तक वापरावे तसेच ते होमिओपॅथीमधील भीष्माचार्य आहेत, असे गौरवोद्गार काढले.
डॉ. बाबा आढाव, म्हणाले, आज वडगावकर यांचे 85 वय असतानाही कोव्हिड काळात वेळेचा सदुपयोग करून समाजासाठी हे तीन ग्रंथ निर्माण करून महान कार्य केले तसेच त्यांनी ओबीसी चळवळीसाठी मंडल आयोग लागू करण्यापासून आजतागायत काम करीत आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलन विचाराशी बांधिलकी समजून दोन्ही मुलीचे आंतरजातीय विवाह करून जातीभेदाच्या पलिकडे जाऊन अखंड मानव जातीचे दर्शन दिले.
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आणि इंजिनियर प्रदीप ढोबळे यांनीही डॉ. वडगावकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
लवकरच त्यांचे महात्मा फुले यांच्या जीवनावर गीत चरित्र येत असल्याचे व छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्यावर पोवाडे केल्याचे रघुनाथ ढोक यांनी सांगून ते फुले एज्युकेशन तर्फे प्रकाशित होत असल्याचे सांगितले.
प्रकाशक सुनील गायकवाड(उंब्रजकर) यांनी हे ग्रंथ समाजोपयोगी असून प्रत्येक घरात असावे, असे सांगितले.
उपस्थितांचे स्वागत डॉ. उज्ज्वला गुळवणी यांनी केले. सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ.संदीप सांगळे यांनी तर आभार रघुनाथ ढोक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर बामणे, सेवा ट्रस्टचे सचिव सौ. शीला वडगांवकर, रमेश कुलकर्णी, सुदाम धाडगे, श्रीकांत गुळवणी, कांचन कुलकर्णी व आकाश-क्षितिज ढोक यांनी प्रयत्न केले.