कबुतरखाने तोडू नये, कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू नये

Date:

मुंबई. भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील कबुतरखाना वाचवण्याची मागणी केली आहे. शिवाय कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या दंडावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. आमदार लोढा यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन दोन्ही मागणीवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून महानगरपालिका मुंबईतील जुने कबूतरखाने जमीनदोस्त आहेत. तसेच कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड आकाराला जात आहे. मुंबईतील गोलदेऊळ येथील ज्या गल्लीचे नाव कबूतर गल्ली आहे, तेथील कबूतरखानाही पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आला आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांशी झालेल्या बैठकीत जैन शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष कनक परमार आणि राष्ट्रीय पशु कल्याण मंडळाचे सदस्य गिरीश भाईही आमदार लोढा यांच्यासह उपस्थित होते. या प्रकरणी आमदार लोढा यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. कबूतरांना दाणे टाकणे हा भारतीय परंपरेचा एक भाग आहे. जगभरात सार्वजनिक ठिकाणावर कबूतरांना दाणे टाकले जातात. मात्र मुंबईत महापालिकेकडून यावर बंदी घालणे म्हणजे भारतीय परंपरा आणि पौराणिक विश्वासांचे उल्लंघन असल्याचे आमदार लोढा यांनी या निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशात असे कुठेही नमूद नाही कि, कबुतरांना दाणे टाकणे बंद करा किंवा दाणे टाकणाऱ्यांकडून दंड आकारण्यात यावा, असे ते सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भत म्हणाले. तसेच आमदार लोढा यांनी कबूतरखान्यांना सुरु ठेवणे आणि कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून मनपाद्वारे करण्यात येणारी कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्तांनी याप्रकरणी कायद्यानुसार योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा गौरव

केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार मुंबई, दि. २२...

हवामान-तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीसाठी २५०० कोटींचा सामंजस्य करार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दावोसमध्ये महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स ग्रुप व न्यूट्रीफ्रेश फार्म...

मुंबईत सरकारने ST प्रवर्गाला डावलल्याचा दावा:पेडणेकरांचा सरकारवर गंभीर आरोप; महापौर आरक्षणावर ठाकरे गट आक्रमक

मुंबई-राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात पार...

पुण्यात २ बड्या नेत्यांना धक्का :महापौर पद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित

मुंबई- महापौरपदाची आरक्षण सोडत आज (गुरुवारी) जाहीर झाली ...