‘इफ्फी’मध्ये एन. डी. स्टुडिओच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Date:

आंतरराष्ट्रीय स्तरावर एन. डी. स्टुडिओची ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून पुढाकार

चित्रीकरण आणि व्यावसायिक सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा

गोवा (दि. २४ नोव्हेंबर २०२६) : गोवा येथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) वेव्हज् फिल्म बझारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने एन. डी. स्टुडिओच्या (एनडीज् आर्ट वर्ल्ड) विशेष दालनाची उभारणी करण्यात आली आहे. या दालनाला देशी-विदेशी चित्रकर्मी, निर्माते, माध्यम प्रतिनिधी आणि सिनेरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एन. डी. स्टुडिओचा कलात्मक वारसा, चित्रीकरणासाठी उपलब्ध सुविधा, विविध उपक्रम आणि व्यावसायिक सहकार्याच्या संधींची माहिती या दालनातून देण्यात आली.

मराठी सिनेमा, महाराष्ट्रातील चित्रीकरण सुविधा आणि महामंडळाच्या विविध योजना व उपक्रम यांची माहिती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सन २०१५ पासून ‘इफ्फी’मध्ये सहभागी होत आहे. यंदाच्या महोत्सवात महामंडळाच्या दालनासोबत एन. डी. स्टुडिओचेदेखील दालन प्रथमच स्वतंत्रपणे उभारले आहे. दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या एनडीज् आर्ट वर्ल्डचे संचालन सन २०२४-२५ पासून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. भव्य सेट, कलाकुसरीने नटलेल्या कलाकृती आणि चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधांचे सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून एन. डी. स्टुडिओने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी ५० टक्के सवलतीची योजना, चित्रपट पर्यटन आणि विविध समारंभांच्या आयोजनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच चित्रीकरणपूरक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे.

वेव्हज् फिल्म बझार विभागात डॉ. सुमित पाटील यांच्या कलादिग्दर्शनाखाली हेमंत भाटकर यांच्या सहकार्याने एन. डी. स्टुडिओचे विशेष दालन उभारण्यात आले असून महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. एन. डी. स्टुडिओशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत, ‘हा स्टुडिओ माझे होमग्राउंड आहे,’ अशी भावना व्यक्त करून आशुतोष गोवारीकर यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. या दालनाच्या माध्यमातून केवळ स्टुडिओतील सुविधांची माहिती देण्याबरोबरच चित्रपट निर्मिती, प्रशिक्षण, चित्रीकरण आणि चित्रपट पर्यटनाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींबाबत अभ्यागतांशी चर्चा करण्यात आली.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इफ्फी’तील सहभागाचे नियोजन करण्यात आले असून अमेरिका, स्पेन, कझाकिस्तान, दुबई आणि हाँगकाँग येथून आलेल्या कार्यकारी निर्मात्यांसह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत मान्यवरांनी या दालनाला सदिच्छा भेट दिली. ऑस्कर अकादमीचे भारतीय प्रतिनिधी उज्ज्वल निरगुडकर यांनीही दालनाला भेट देत महामंडळाला आणि एन. डी. स्टुडिओ उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी दालनाला भेट दिली. महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्त व प्रशासकीय अधिकारी चित्रलेखा खातू यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी उपअभियंता विजय बापट, सहाय्यक लेखा अधिकारी महेश भांगरे , विपणन अधिकारी सोनाली जकातदार व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

……………………..

‘इफ्फी’त कोल्हापूर चित्रनगरीचेही स्वतंत्र दालन

यंदाच्या ‘इफ्फी’मध्ये कोल्हापूर चित्रनगरीनेदेखील पहिल्यांदाच सहभाग नोंदवला असून वेव्हज् फिल्म बझार विभागात कोल्हापूर चित्रनगरीचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. कोल्हापूर चित्रनगरीचा वारसा, चित्रनगरीतील विविध सेवा-सुविधा, आजवर चित्रीत झालेले महत्त्वाचे प्रकल्प यांची माहिती या दालनाच्या माध्यमातून अभ्यागतांना देण्यात येत असून या दालनास देश-विदेशांतील चित्रकर्मी, सिनेरसिक आणि माध्यमकर्मींनी सदिच्छा भेट देत कोल्हापूर चित्रनगरीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी कोल्हापूरचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सावंत, समीक्षा भोसले, चंद्रकांत कांबळे दालनामध्ये उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्त्यावर राडारोडा टाकणे पडले महागात; बुधवार पेठेत बांधकाम व्यावसायिकाला २५ हजारांचा दंड!

‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’वर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता...

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय२० मराठी चित्रपटांचा महोत्सव६ ते ९ डिसेंबर काळात रसिकांना पर्वणी

पुणे-महाराष्ट्र शासनाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ‘रौप्य...

हर्षदा फरांदे यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी...