पुणे:
‘हज’ला यात्रेसाठी जाणार्या यात्रेकरूंचा सत्कार आज ‘अवामी महाज’ या संस्थेतर्फे डॉ. पी .ए .इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम आझम कँम्पस येथील डेंटल कॉलेज येथे बुधवारी सकाळी झाला. ‘हज’ला जाणार्या यात्रेकरूंनी सर्वांच्या सुख, समाधान आणि शांततेसाठी प्रार्थना करावी’ आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला, असे डॉ. पी. ए. इनामदार यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी प्रमुख पाहुणे मुस्लिम बँकेचे संचालक आझीम गुडाखूवाला, हाजी कदीर कुरेशी, उस्मान दाऊद खान, चाँद शेख, अब्दुल वाहब, वाहिद बियाबानी, एस. ए. इनामदार, शाहीद इनामदार, लतिफ मगदूम, अवामी महाज संस्थेचे सदस्य व ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात हाजी कदीर कुरेशी, मौलाना हुसेन कुराण पठण केले. मुफ्ती अहमद काझी यांनी हजच्या बाबतीत विस्तारीत माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत अवामी महाराजचे सचिव वाहिद बियाबानी यांनी केले.
यावेळी हज यात्रेला जाणार्या यात्रेकरूंना शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. सर्व हज यात्रेकरूंनी यावेळी शिरखुर्माचा आस्वाद घेतला. अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी यांनी आभार मानले.