ज्येष्ठाना मैत्रीपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा :जयंतीभाई शहा
पुणे :’चॉईस ग्रुप’च्या चॉईस हॉस्टेल फॉर सिनियर्स,चॉईस विरंगुळा केंद्राचे २६ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. महामार्गालगत वारजे माळवाडी येथे हे सुसज्ज विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. ‘चॉईस ग्रुप ‘चे संस्थापक जयंतीभाई शहा यांनी उद्घाटन प्रसंगी विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठांसाठीच्या हॉस्टेल विषयी माहिती दिली.
हा कार्यक्रम २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला . या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी विशेष उपस्थिती लावली होती . उपस्थितांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले आणि चॉईस ग्रुपचे संस्थापक जयंतीभाई शहा यांचे अभिनंदन केले.
‘चॉईस हॉस्टेल फॉर सिनियर्स’ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ९ वातानुकुलीत अत्याधुनिक सोयींयुक्त खोल्या आहेत. २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.पूर्ण शाकाहारी, लज्जतदार व पौष्टिक जेवण व नाश्ता मिळणार आहे. योगाभ्यास,संगीतोपचार,आहार मार्गदर्शन,करमणुकीची साधने, व्याख्याने, कलोपासना, वाचन , आवडीचे खेळ येथे असणार आहेत. करमणुकीचे कार्यक्रम,गप्पा,चर्चा यासाठी खुली जागाही येथे आहे. तसेच या ठिकाणी १५ खोल्यांचे सुसज्ज असे गेस्ट हाऊस बांधण्यात आले आहे. ते सर्वांसाठी खुले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी चॉईस विरंगुळा केंद्र दि. १ मार्च २०२० पासून दुपारी ३ ते ७ यावेळेत सुरु असणार आहे.वैद्यकीय सेवा,योगाभ्यास इत्यादी उपक्रम येथे असणार आहेत.
यावेळी बोलताना जयंतीभाई शहा म्हणाले,’प्रत्येकाला निरोगी,छान,स्वछंदी आयुष्य जगण्याची इच्छा असते .मात्र ,आजच्या धावपळीच्या युगात अमाप पैसा असुनही ही इच्छा सुयोग्य पध्दतीने पुर्ण करता येत नाही. या उलट भरपुर आरोग्यसेवा,प्रसार व संपर्क माध्यमे हाताशी असुनही, माणुस माणसांपासुन विभक्त आणि आत्मकेंद्रित होत आहे असे दिसते.विशेषत:
जेष्ठांना एकाकी व कंटाळवाणे आयुष्य कंठावे लागते,आणि या साऱ्या त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सुरक्षित, समवयस्कांबरोबर मैत्रीपुर्ण,स्वच्छंदी आयुष्याचा आनंद घेता यावा याकरिता कमलप्रभा चॉईस फाऊंडेशन ज्येष्ठांच्या सेवेसाठी नविन उपक्रम सुरु करत आहे’.
‘चॉईस ग्रुप’ १९५८ पासून पुण्यामध्ये सिमेंट व्यवसाय,केटरिंग,गेस्ट हाउस,बॉईज होस्टेल,फिल्म मेकिंग,कॉमर्स कॉलेज,स्विमिंग पूल,हेल्थ क्लब अशा विविध माध्यमातून काम केले आहे. समाजोपयोगी कामांसाठी कमलप्रभा चॉईस फौंडेशन स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याची माहिती,जयंतीभाई शहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली .