‘काव्य कुसुमांजली’ तून सादर होणार काव्यावर आधारित कथक नृत्यरचना

Date:

पुणे : गुरू रोशन दात्ये यांच्या रोचित कथक अकादमीतर्फे “काव्य कुसुमांजली” या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी (दि.१) करण्यात आले आहे. कवि कुसुमाग्रज, बालकवी, इंदिरा संत, शांता शेळके यांच्या काही  निवडक व अजरामर कवितांचे सादरीकरण कथक नृत्याच्या माध्यमातून यात होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होईल.

रोचित कथक अकादमीच्या ४०व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर सुरू असलेल्या ‘परितोष’ या शृंखलेतील “काव्य कुसुमांजली” हे ४थे पुष्प आहे. यातून साज-श्रृंगार लावणी, अभंग, पोवाडा अश्या अनोख्या रचना कथकच्या माध्यमातून सादर होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन गुरू  रोशन दात्ये यांचे असून डाॅ.माधुरी जोशी यांच्या निवेदनातून कवी व कवितांविषयीच्या खास आठवणी उलगडल्या जाणार आहेत.

मराठीभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली म्हणून ही मैफल होत असून प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक व गीतकार श्री सुनिल सुकथनकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...