पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती , पुणे महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे शुभहस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषा आपली मातृभाषा आहे दर्जाची नवमाध्यमांमुळे आजची पिढी भाषेची लक्तरे वेशीवर टांगत आहे. एखाद्या ठरावीक दिवशी मराठी भाषेचा गोडवा गाण्यापेक्षा दैनंदिन वापरात तिचा वापर होणे गरजेचे आहे. ग्रामीण, दलित, स्त्रीवादी अशा अनेक साहित्य प्रवाहात लेखन करणाऱ्या त्या त्या साहित्यिकांची पुस्तके वाचा. लेखन, वाचन आणि मनन यावर भर दिला तर मराठी किती समृद्ध आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. इंग्रजीचे ज्ञान प्राप्त करतांना आपल्याला मराठी भाषेचा विसर पडायला नको असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी यांनी वृत्तपत्रातील विविध कात्रणे प्रदर्षित करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी चालेल्या प्रयत्नांची जाणीव उपस्थिताना करून दिली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.गणेश कोंढाळकर,सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिकक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी यांनी केले.