‘सी -गुगली २०२०’ टेक्निकल एक्स्पर्टाइझ कॉम्पिटिशनचे उदघाटन
पुणे :
भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) आयोजित ‘सी -गुगली २०२०’ या आंतर महाविद्यालयीन टेक्निकल एक्स्पर्टाइझ कॉम्पिटिशनचे उदघाटन आज वेस्टर्न युनियनचे व्यवस्थापक झोएब तन्वीर, वेस्टर्न युनियनचे ग्रुप हेड मुकुंदन यांच्या हस्ते झाले. यावेळी आयएमईडीच्या एमसीए विभागाचे प्रमुख डॉ.अजित मोरे,स्पर्धेच्या संयोजक डॉ.स्वाती देसाई,प्राध्यापक वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.ही दोन दिवसीय संगणक ,माहिती तंत्रज्ञान विषयक ज्ञानाची स्पर्धा २१,२२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. पुण्यातील विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला आहे.