पुणे- धनकवडीतल्या पद्मावती नगरहून,क्रांतिसूर्य फुले म्हणजेच 3 हत्ती चौकात जाणाऱ्या डीपी तील रस्त्यावर महापालिकेनेच क्रीडा संकुल उभारल्याने आता या सोसायटीला रस्ता वळवून तो करून देण्यात असल्याचे स्पष्टीकरण पद्मावातीनगर (धनकवडी )सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मायमराठी ‘कडे केले आहे. ३ हत्ती चौकानजीक ,क्रीडा संकुलाला लागून पद्मावतीनगर ला रस्ता देण्याचे काम डोंगर फोडून केले जात असल्याने हे स्थळ अपघाती स्थळ होण्याचा धोका स्पष्ट दिसत असल्याचे सांगून अप्पा परांडे आणि अनिल बटाने यांनी आक्षेप घेत हा रस्ता होवू नये अशी मागणी केलेली आहे . या ठिकाणी होणारा रस्ता थेट सोसायटीच्या जागेतच येत आहे.त्यासाठीसोसायटी ने जागा दिली आहे. ,तो करताना हत्ती चौकाकडे जाणारी वाहने आणि पद्मावती नगर कडून येणारी वाहने यांच्यात अपघात होवू नये याची दक्षता घेवूनच महापालिकेने हे काम सुरु केल्याचा दावा देखील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.