संभाजी उद्यानात आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा ‘आर्टिस्टिक कॉर्नर ‘
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘ च्या विद्यार्थ्यांनी बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन ,पुणे पालिकेच्या सहकार्याने टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक असा ‘आर्टिस्टिक कॉर्नर ‘ संभाजी उद्यानात तयार केला आहे .पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून हा ‘आर्टिस्टिक कॉर्नर ‘ करण्यात आला आहे.
कॉलेजच्या बी -आर्क अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वाहनांचे जुने टायर ,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून अनेक कलात्मक गोष्टी उद्यानाच्या कोपऱ्यात तयार केल्या आहेत .
त्यात रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करून झाडांना संरक्षणाचा पार तयार करण्यात आला आहे ,वाहनांच्या जुन्या टायरपासून लांब सापाचे कुंपण ,खेळण्यासाठी टायरची ‘जंगल जीम ‘ तयार करण्यात आली आहे तसेच पुण्याची शिवकालापासून मेट्रोपर्यंत प्रगती दाखविणारी ग्राफिटी वॉल रंगविण्यात आली आहे .
विद्यार्थ्यांना प्राचार्य लीना देबनाथ ,प्रा . अमीर पटेल यांनी मार्गदर्शन केले . ‘अर्बन -९५’ अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला .