Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चारुहास पंडित आणि चिमुकल्यांनी साकारला वाडा संस्कृतीतील ‘चिंटू ‘ !

Date:

पुणे :वाडा संस्कृतीतील पारंपारिक वातावरण, जुने खेळ, अस्सल मराठी पाटावरील भोजन अशा वातावरणात चिमुकल्यांना त्यांच्या आठवणीतील आजोळ, महिलांना मनातलं माहेर, आणि स्वप्नातलं घर शनिवारी सापडलं !
निमित्त होते पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ‘ढेपेवाडा ‘ आयोजित  ‘चिंटू ‘ आणि वाडा संस्कृतीतील खेळ ! ‘ या उपक्रमाचे आणि एक दिवसीय सहलीचे !
‘चिंटू ‘ चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित यांनी या सहलीतील सहभागी मुलामुलींना ,पालकांना ‘चिंटू ” ची रेखाटने करून दाखवली .बालगोपाळांनी चिंटूचे चित्र रंगविण्याचा आनंद लुटला. कार्टून, अॅनिमेशन या प्रकाराची माहितीही चारुहास पंडित यांनी दिली.
 ‘ढेपेवाडा ‘ चे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे या पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवले. त्यात लगोरी, सागरगोटे, भोवरा, सूर पारंब्या, सारीपाट, खांब खांब खांबोळी, गोटया, आंधळी कोशींबीर, भातुकली, आटया पाटया अशा अनेक पारंपारिक खेळांचा समावेश होता.
  ,वाडासंस्कृतीतील रहाणीमानाची , जीवनशैलीची ओळख करून देण्यात  आली . मुदपाकखाना, उखळ, जातं, तुळशी वृंदावन, विहीर, घंगाळ,चौरंग, झोपाळा या विस्मृतीत चाललेल्या चीजा बघून बालगोपाळ हरखून गेले.
शनीवारी सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत या सहलीत
७ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींना एक वेगळा अनुभव पालकांसह घेता आला.
बालगोपाळांनी ढेपेवाडा महाद्वार, दिंडी दरवाजा, देवळी, देवघर, दिवाणखाना, मुद पाकखाना, न्हाणीघर , शयनघर, पलंग अशा जुन्या वास्तू वैशिष्टयांसह पाहिला.
‘ढेपेवाडा ‘ हा मुळशीच्या गिरीवन पर्यटनप्रकल्पात असलेला पुणेरी वाडा असून वाड्याची सर्व वास्तू वैशिष्टये येथे पाहावयास मिळतात जुनी संस्कृती जपण्यासाठी खास ‘ढेपेवाडा ‘ बांधून वाड्यातील संस्कृतीचे यथार्थ दर्शन व तशाच राहणीमानाचा , जीवनशैलीचा आनंद देणारे पुण्यातील हे एकमेव पर्यटन स्थळ आहे ,अशी माहिती नितीन ढेपे यांनी दिली.
या उपक्रमातून नव्या पिढीला एकत्रित कुटुंब पध्दतीची माहिती  देण्यात आली आणि महत्व सांगण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...