Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जिल्हा परिषद शिक्षिका अनुराधा काजळे निघाल्या किलीमांजारो शिखरावर

Date:

360 एक्सप्लोरर मार्फत पहिल्या जिल्हा परिषद शिक्षक जाणार आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षांपासून खडतर सराव 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे  या  दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर करण्यासाठी रविवारी रवाना झाल्या आहेत. 360 एक्सप्लोररच्या वतीने आयोजित मोहिमेचा फ्लॅग ऑफ एव्हरेस्टवीर व विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते करून शुभेच्छा देण्यात आल्या. या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला ठरणार आहेत. यासोबतच  जिल्हा परिषदेच्या पहिल्या शिक्षिका होण्याचा मानही त्यांनाच मिळणार आहे.

आफ्रिकेतील टांझानिया  देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. गेल्या 6 वर्षात सोलापूरमधील जवळपास 250 प्रोफेशनल गिर्यारोहक व ट्रेकर्स आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. गेल्या 3 वर्षात तब्बल 12 लोकांनी आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेले 1 वर्ष सराव करून अनुराधा काजळे या मोहिमेवर जात आहेत.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेने स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोरर मार्फत साहसी खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेगवेगळ्या जागतिक मोहीम आखल्या जात आहेत त्या मध्ये वेगवेगळ्या खंडातील गिर्यारोहण, स्काय डायविंग, स्कुबा डायविंग हे सर्व समाविष्ट आहे.

360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लब

सोलापूर मधील सर्वच शिक्षकाना ट्रेकिंग ची आवड निर्माण व्हावी तसेच त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ओळख निर्माण व्हावी म्हणून आनंद बनसोडे व इतर गिर्यारोहकांनी “360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लब” सोलापूरमध्ये सुरू केले आहे. त्याची अध्यक्ष म्हणून अनुराधा काजळे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

-अनुराधा काजळे यांची माहिती-

अनुराधा काजळे या सोलापूर जिल्हा परिषद   विडी घरकुल शाळेतील शिक्षिका आहेत. त्या कवयित्री असून त्यांचे ‘मनीचे गुज’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी यापूर्वी स्वर्गारोहिणी व कळसुबाई यासह विविध शिखर सर केले आहेत. त्यांचा स्वकुळरत्न यासह विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. नुकतीच त्यांची 360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लबच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे.

– आनंद बनसोडे – 

“सोलापूरमधील प्रथम शिक्षिका व महिला गिर्यारोहक म्हणून अनुराधा काजळे यांचे प्रथम अभिनंदन. त्याचे त्यांच्या स्वप्नावरील प्रेम व जिद्द याची तोड कशाशीही करता येणार नाही. किलीमांजारो सर करून जिल्हापरिषद शिक्षकांपुढे एक आदर्श निर्माण करतील यात शंका नाही. 360 एक्सप्लोरर मार्फत अनेकांना जागतिक मोहिमांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...