‘ टाकाऊ गोष्टीतून टिकाऊ कला वस्तू’ ( बेस्ट आऊट ऑफ वेस्ट ) प्रदर्शनाला प्रतिसाद
पुणे :
अद्विता डोंगरे, प्राजक्ता काळे , मृण्मयी जबडे या सहावीतील विद्यार्थिनिंनी टाकाऊ गोष्टीतून टिकाऊ कला वस्तू ‘ ( बेस्ट आऊट ऑफ वेस्ट ‘ ) विषयक प्रदर्शनाला प्रतिसाद रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
‘ कला फ्यूजन २०१८ ‘ हे प्रदर्शन डेक्कन जिमखाना क्लब येथे २० -२१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. ‘उम्मीदों का उजाला ‘ अशी या प्रदर्शनाची संकल्पना होती.
या तीन विद्यार्थिनींनी टाकाऊ पदार्थांचा वापर करुन दिवाळीसाठी आकर्षक पणत्या, दिवे तयार केले होते. पुणेकरांनी त्यांचे कौतुक केले
युवक क्रांती दलाच्या शहराध्यक्ष मयुरी शिंदे, डॉ. प्रीति काळे, प्रा.मीनल जबडे, सपना डोंगरे
यांच्या हस्ते तिन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.