भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
पुणे :
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी अभियंता दिनानिमित्त कात्रज येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी दिली.
शाळेतील मुलांना अभियांत्रिकीची आवड निर्माण व्हावी. यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेलची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जास्रोत, हायड्रॉलिक व न्यूमॅटिक सिस्टीम, रोबोटिक्स व ऑटोमेशन यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संयोजन दत्तात्रय जाधव यांनी केले. प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सत्यजित महतो, सागर मोलाह, संदीप कुमार, नीरज यादव, हिमांशू कुमार, तरुण कुमार, अभय सिंह, अनिश पांडे आदि विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके दाखविली.