जावेद हबीब यांच्या हस्ते ‘पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्यूटी’ चे उद्घाटन
पुणे :‘गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट’ संचालित ‘पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्यूटी’ चे उद्घाटन आज शनिवारी दुपारी जावेद हबीब ( इंटरनॅशनल हेअर स्टायलिस्ट) यांच्या हस्ते झाले.
डॉ.पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष एस.बी.एच. इनामदार, उपाध्यक्ष शाहीद शेख , माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर मुनव्वर पीरभॉय (हाजी गुलाम आझम एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष), एस. ए. इनामदार, अब्दुल शेख, शाहिद मुनीर, दानिश खान, युसूफ शेख उपस्थित होते.
विविध ब्युटी पार्लर चे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, भवानी पेठ येथे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन आरा शेख आणि रुमाना शेख तर प्रास्ताविक वाहिद बियाबानी यांनी केले. अयाज शेख यांनी आभार मानले.
‘पै इंटरनॅशनल स्कूल ऑफ हेअर अँड ब्यूटी’ मध्ये अनेक केशरचनांचे , सौंदर्यप्रसाधनविषयक प्रशिक्षण दिले जाते .
स्कूल ऑफ हेअर अँड ब्यूटी मध्ये इंटरनॅशनल डिप्लोमा मध्ये सिडिस्को ब्युटी अँड बॉडी डिप्लोमा, सिडिस्को स्पा डिप्लोमा, सिडिस्को मेक अप डिप्लोमा, सिडिस्को ऍरोमाथेरपी, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्से इन सिडिस्को स्किन केयर, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्सेस इन अनेस्थेटिकस , बॉडी थेरपी, नेल आर्ट यांचा समावेश आहे.
तर बेसिक डिप्लोमा कोर्स मध्ये डिप्लोमा इन बेसिक ब्युटी सर्व्हिस, डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग, प्रोफेशनल हेयर अँड ब्युटी डिप्लोमा, डिप्लोमा इन ऍडव्हान्स अनेस्थेटिकस, डिप्लोमा इन क्लिनिकल अनेस्थेटिकस, डिप्लोमा इन मेक अप, डिप्लोमा इन बॉडी थेरपी, डिप्लोमा इन स्वीडिश बॉडी मसाज, डिप्लोमा इन स्पा थेरपी इत्यादी अभ्यासक्रम आहेत.
हे सलून मूलभूत गोष्टींच्या माध्यमातून कशाप्रकारे मेक अप करावा याचे प्रशिक्षण देणार आहे. ‘स्कूल ऑफ हेअर अँड ब्यूटी’ मुळे केशरचनेची अत्युत्तम पातळी गाठण्यास मदत होऊ शकते तसेच ‘स्पा’ चा अनुभव मिळू शकतो.
उच्च प्रशिक्षित आणि क्रिएटिव्ह ट्रेनर्सच्या उपस्थितीत अभ्यासक्रम शिकविला जाईल.