जीवनातील काळोखाला कोलटकर यांनी टिपले : भास्करराव हंडे यांची भावना

Date:

‘रसिक मित्र मंडळ‘च्या ‘एक कवी एक भाषा‘ व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
 
पुणे :जीवनात प्रकाशमय बाजूपेक्षा काळोखी बाजू अधिक असते, आणि तीच टिपण्याचे काम कवी-चित्रकार अरुण कोलटकर यांनी त्यांच्या कवितातून केले,अशा भावना अरुण   कोलटकर यांचे सहकारी आणि प्रसिद्ध चित्रकार भास्करराव हंडे (नेदरलँड) यांनी व्यक्त केली.
‘रसिक मित्र मंडळ‘ आयोजित ‘एक कवी एक भाषा‘ व्याख्यानमालेत 54 व्या मासिक व्याख्यानाचे आयोजन ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ‘ येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुकवारी सायंकाळी झाला. अध्यक्षस्थानी ‘रसिक मित्र मंडळ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला होते.
चित्रकार हंडे म्हणाले, ‘कोलटकर हे श्रेष्ठ चित्रकार, श्रेष्ठ कवी, श्रेष्ठ रचनाकार होते, त्यांनी ‘भिजकी‘ वही’ काव्यसंग्रहातील  कवितातून स्त्रियांच्या वेदना,सोशिकपणा टिपला, कमीतकमी रेषातून त्यांनी चित्रे रेखाटली. कमीतकमी शब्दात आषयगर्भ कविता लिहिल्या. मराठीचा जातीवंत वास येणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या.
त्यांना अधिक चांगले बुध्दीमत्तेची पारख करणारे समीक्षक मिळायला हवे होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘कवी आणि चित्ररचनाकार एकच असतो, तेव्हा त्याच्या ज्ञानेंद्रियात ज्या प्रक्रिया घडतात, त्या समजणे अवघड असते, म्हणून कोलटकर आपल्याला समजत नाहीत ‘, असेही हंडे यiनी सांगितले.
श्याम मनोहर, प्रा. माधव वझे, प्रा. माधवी वैद्य, प्रदीप निफाडकर तसेच कोलटकर यांचे बंधू -भगिनी यावैळी उपस्थित होते. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव

संगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर पुणे...

पुणेकरांना अपेक्षित असाच गणेशोत्सव करू : मुरलीधर मोहोळ

गणेशोत्सव हा पुणेकरांचा लोकोत्सव; लोकसहभाग अधिक व्यापक करण्याची ग्वाही ‘गणेशोत्सव...

IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा,...

मिरवणुकीचा खर्च टाळला; गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला निधी

शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाचा आदर्श गणेशोत्सव; उर्वरित...