पुण्याच्या गणेशोत्सवाचा ब्रँँड अॅम्बेसिडर कोण होणार ? बच्चन कि तेंडूलकर ?(व्हिडीओ)

Date:

कलमाडींचा फेस्टिव्हल झाला ;आता भाजपचा ग्लोबल गणेशोत्सव
पुणे- पुण्यात पहिल्यांदाच भाजपचा  प्रचंड बहुमताने पालिकेवर झेंडा फडकल्याने याचा आनंद आता पुण्याच्या गणेश उत्सवातूनही झळकणार आहे . अर्थात उत्सवाचे १२५ वे वर्ष आहे असे सांगितले जाते आहेच .पण एकंदरीत या सोहळ्यासाठी यंदा प्रथमच 2 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केले जाणार असल्याने प्रत्येक पुणेकरांच्या स्मरणात राहील असा उत्सव व्हावा अशी अटकळ बांधून त्याचे नियोजन करण्यात येवू लागले आहे .
पुण्याच्या गणेश उत्सवाला आता
ब्रँँड अॅम्बेसिडर लाभणार आहे . या साठी बिग बी अमिताभ बच्चन पासून ते सचिन तेंडूलकर पर्यंत काहींना संपर्क साधण्यात आला आहे . पण जोपर्यंत सारे काही निश्चित होत नाही तोपर्यंत याबाबत वाच्यता करायची नाही असेही ठरले आहे . दरम्यान तेंडूलकरांचा विषय आज महापौरांशी बोलताना निघालाच . पण तेंडूलकर ने मात्र अद्याप मंत्र्यांच्या पत्राला उत्तर दिलेले नाही , बच्चन जी यांचे अद्याप काही समजले नाही .. पण या दोघांपैकी कोणी तरी 1
ब्रँँड अॅम्बेसिडर करण्यासाठी मुंबईतील मंत्रालयाच्या पातळीवरून हालचाली करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे .
या उत्सवात वादग्रस्त ठरू शकेल अशा 5 हजार ढोल वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे वृत्त आहे . अगोदरच नदीपात्रातील सरावाने त्रस्त होणाऱ्या पुणेकरांना आता 5 हजार ढोलवादनाच्या आवाजाला सामोरे जाण्याची मानसिकता तयार करावी लागणार आहे . त्याला इलाज नाही उत्सव आहे .उत्साहात व्हायला हवा . पण ढोल वादनाचे सर्वोच्च रेकोर्ड पुण्याच्याच नावावर असताना आता आणखी हा अट्टाहास कशासाठी आणि कुणासाठी ? याच्याव्यात्रिक्त आणखी काही वेगळे सर्वांना रुचेल असे काही करता येणार नाही काय ? असे हि प्रश्न विचारले जावू लागले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डिजिटल युगात ‘सायबर प्रतिकारशक्ती’ काळाची गरज – राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथन

कोल्हापुरात राज्य महिला आयोगाची सायबर सुरक्षा, बीएनएस कायदे या...

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुर

नवी दिल्‍ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत,...

तीन दिवसांत चार महाकाय होर्डिंग उखडले: खेड शिवापूर परिसरात कारवाईचे सत्र सुरू

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या...