Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

…आणि अनिकेत विश्वासरावला पाण्यात ढकलून पूजाने काढला पळ

Date:

आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यातील गुजगोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांना असते. खास करून, आवडती डिश, फेव्हरेट कलर तसेच त्यांची प्रेम प्रकरणं अशा अनेक गोष्टीचा मागोवा हि चाहतेमंडळी घेत असतात. अश्या ह्या चाहत्यांसाठी, एक गमतीदार बातमी आहे.

श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित बसस्टॉप सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक भन्नाट किस्सा आहे. तो म्हणजे, पुजाला पाण्याची फार भिती वाटते त्यातही स्विमिंग पूल म्हटलं तर नको रे देवा अशी अवस्था पूजाची होते. मात्र सिनेमाच्या एका सीनसाठी पुजाला पाण्यात उडी मारावी लागणार होती. अनिकेत विश्वासरावला पाण्यात धक्का मारून तिला स्वतः पाण्यात उडी मारायची होती, त्यानुसार सगळे ठरले देखील. दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हंटले, आणि पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले, मात्र स्वतः पाण्यात उडी मारायचे सोडून तीने चक्क पळच काढला.

पूजाच्या या कृतीमुळे टीममध्ये सर्वत्र हशा पिकला. मात्र रिटेकमध्ये पूजाने हिम्मत करुन सीन पूर्ण केला. अशी हि चित्रीकरणादरम्यान झालेली छोटीशी गम्मत जरी असली, तरी याहून अधिक भन्नाट गोष्टी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात पूजा आणि अनिकेतबरोबरच  अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे ह्या कलाकारांची धम्माल देखील पाहायला मिळणार आहे. पडद्यावरच्या या सर्व कलाकारांच्या गंमतीजमती २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आ

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...