Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्रपुरस्कृत योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करावी -खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

Date:

पुणे, दि. 14 –केंद्र शासन पुरस्कृत विविध लोककल्याणकारी योजना जिल्हयामध्ये राबविण्यात येत असतात. या योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करुन लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याची सूचना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) तर्फे वेळोवेळी घेण्यात येतो. या समितीची बैठक विधान भवन सभागृहात समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस समितीचे सदस्य पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, आ.मेधा कुलकर्णी, आ.भिमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे महापौर नितीन काळजे, विविध समित्यांचे सभापती उपस्थित होते.

समितीचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या पूर्ततेसंबधी आढावा घेताना, योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी त्वरीत सोडविण्याची सूचना केली. या बैठकीत गत वर्षी राबविण्यात आलेल्या योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. चालूवर्षी जून अखेर झालेल्या खर्चाचा तपशील बैठकीत सादर करण्यात आला. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी योजना राबवितांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची सूचना खासदार आढळराव पाटील यांनी केली.

बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, भूमी अभिलेख्यांचे संगणकीकरण, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट ॲग्युमेंटेशन योजना, अटल मिशन फॉर रिज्युव्हीनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, स्मार्ट सीटी मिशन, उज्वल डिस्कॉम एश्योरन्स योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला समितीचे सदस्य, नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अ.ना.हिंगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, संबधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुण्याचे नेतृत्व का नको ?

पुणे- पुण्याला आज कोणा पुण्याच्याच नेत्याचे नेतृत्व उरलेले आहे...

पुण्यातील मातब्बर नेते दीपक मानकर यांचा अजित पवारांकडे राजीनामा…

पुणे- शहरातील मातब्बर म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि नेतृत्वाच्या मुख्य...

पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास – धीरज घाटे

पुणे ता १३ ;- लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे...

धीरज घाटे हेच पुन्हा भाजपचे शहर अध्यक्ष…

पुणे :भारतीय जनता पार्टीने आज (ता.13 मे)...