‘गंगाजल’ मधल्या ‘सुंदर यादव ‘ चा महापालिकेत स्वैराचार ?

Date:

पुणे- महापालिकेच्या जागा , विविध क्रीडा संकुले, टेंडर ,नगरसेवक आणि त्यांची नातेवाईक घेत असल्याचा आरोप आता सर्रास होतो आहे , परवा तर मुख्य सभेत एका नगरसेविकेने आपल्या नातेवाईकाला पे अँड पार्क चा ठेका मिळावा असे चक्क उघडपणे भाषणात सांगितले … या सर्व पार्श्वभूमीवर आता काल सायंकाळी महापालिकेच्या मुख्य भवनात , बांधकाम विभागातील एक अभियंता ऐकत नाहीच हे पाहून, तो बसलेला असलेल्या,  खुर्चीवर  लाथ मारून , एका नगरसेविकेच्या पतीने त्याला दमदाटी केल्याच्या घटनेचे  आज थेट मुख्य सभेत पडसाद उमटले .
एकीकडे बोगस कर्मचाऱ्याच्या सूत्रधाराला पाठीशी घालायचे आणि दुसरीकडे  मुख्य भवनात येताना जाताना सामान्य नागरिकांना अडविणे , त्यांची चौकशी करणे असे प्रकार सुरु आहेत  , मुख्य भवनातील असे दमदाटीचे प्रकार  उघड होऊ नये म्हणून सीसी टीव्ही यंत्रणा हि निष्प्रभ ठरविली जाते आहे .
आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि भैयासाहेब जाधव यांनी गुंडाच्या वेशभूषेत प्रवेश करीतच ‘ सुंदर यादव’ प्रवृत्तीचा निषेध केला . ठेकेदारांना धमकाविणे ,अधिकाऱ्यांना धमकाविणे असे प्रकार चालू असल्याचा आरोप या वेळी राष्ट्रवादीने केला .. अशा ‘सुंदर यादव’ प्रवृत्ती पासून अधिकाऱ्यांचे संरक्षण करणार कोण ? असा सवाल यावेळी राष्ट्रवादी कडून करण्यात आला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रब्बी ज्वारीच्या बियाण्यांसाठी ५० टक्के अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिकांसाठी १००...

दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांसह चारा उत्पादनाला प्राधान्य

पुणे जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवर ज्वारी, ८० हेक्टरवर हरभरा...

अमृता फडणवीस यांच्याबरोबर प्रवीण दरेकरांनीही धरला ठेका ! ‘मारी महिसागर’ गाण्यावर गरब्याचा जल्लोष

‘वहिनी आल्या आणि कार्यक्रमाचा चेहरामोहराच बदलला’ — प्रवीण दरेकर मुंबई...

मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उद्या उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील

‘मजबुरी का नाम मंगेश चिवटे!’ पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकारणावर...