लव्ह लग्न लोचा मधील राजा म्हणजेच रोहनच्या लग्नाला फक्त १५ वऱ्हाडी!!!

Date:

रोहनच्या लग्नाला फक्त १५ वऱ्हाडी किंवा चि.रोहन चिसौका स्नेहल आणि फक्त १५ वऱ्हाडी किंवा रोहनचे अनोखे शुभमंगल म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर लग्न कसं हजारभर निमंत्रितांच्या उपस्थितीत दणक्यात व्हायला हवं…त्यात वेडिंग डेस्टिनेशन किंवा विमानात नाहीतर थेट स्कूबा डायव्हिंगच्या थाटात केलं तर भन्नाटच. डिझायनर ड्रेस आणि थीम मॅरेज असेल क्या बात है. तीन चार प्रादेशिक मेन्यूची लज्जतही हवीच. सध्या लग्न म्हटलं असे संवाद हमखास कानावर पडतात. त्यात नवरानवरी सेलिब्रीटी असतील लग्न हा इव्हेंटच असतो. पण लव्ह लग्न लोचा मालिकेत राजाच्या भूमिकेतून आपल्या सर्वांना माहिती असलेला रोहन गुजर आणि त्याची मैत्रीण स्नेहल देशमुख यांनी मात्र हटके लग्न केलं आहे. साईबाबांचं मंदिर, भटजीबुवा, दोघांचे आईबाबा, सख्खी भावंडं अशा फक्त १५ वऱ्हाडींच्या साक्षीने रोहन आणि स्नेहल यांनी सहजीवनाच्या प्रवासाला सुरूवात केली. होणार सून मी या घरची, बन मस्का आणि आता लव्ह लग्न लोचा या मालिकेत रोहन गुजर याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण याच रोहनने १५ वर्षापूर्वी मैत्रीण स्नेहल हिचे मन जिंकले. दीड दशकाच्या खास मैत्रीनंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. पण रोहनला डामडौल करत लग्न करायचं नव्हतं. रोहन सांगतो, मी हा निर्णय स्नेहलला सांगितला आ​​णि तिलाही तो पटला. मग आमच्या कुटुंबीयांना या निर्णयाबाबत सांगितले. सुरूवातीला त्यांच्याकडून नाराजीचा सूर उमटला, पण आमच्या निर्णयाला त्यांनी अखेर पाठिंबा दिला. लग्नातला खर्च टाळण्यासाठी नव्हे तर लग्नासारखा आपल्या आयुष्यातील खास सोहळा कुटुंबीयांच्या सानिध्यात व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचेही रोहन सांगतो. शिवाय लग्नात खूप मंडळी आली तरी त्यांना आपल्याला नीट वेळही देता येत नाही. अर्थात अभिनेता रोहन आणि झी वाहिनीसाठी डिजिटल हेड म्हणून काम करणाऱ्या स्नेहलचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यामुळे लग्नाला न बोलवल्याबद्दल मित्रमैत्रीणींकडून ओरडूनही घ्यावे लागले. पण रोहनचा फंडा ऐकून आता त्याच्या काही मित्रांनी अशाच प्रकारे लग्न करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. सकाळी मंदिरात लग्न झाल्यानंतर गुजर आणि देशमुख फॅमिलीने एका हॉटेलमध्ये मस्त एकत्र जेवण केलं आणि दुपारी ही मंडळी रोहनच्या घरीही आली. इतकेच नव्हे तर लग्नानंतर तीनचार दिवसात रोहन लव्हलग्नलोचा मालिकेच्या शूटसाठी हजरही होता.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...