पुणे-वडगावशेरी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 5 महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.श्वेताताई मुकुंद गलांडे यांच्या वतीने आयुष्मान भारत योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांचा आरोग्य विमा योजना तसेच आयुष्मान भारत योजना मध्ये नाव नसलेल्या कुटुंबीयांना पुणे महानगरपालिकेचे शहरी गरीब वैद्यकीय योजना नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य व इसमा कायदेशीर समिती च्या सह अध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या नोंदणी अभियानचा समारोप संपन्न झाला. यावेळी मुकुंदनाना गलांडे, संतोषजी गलांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमुळे अनेक गरजू लोकांना लाभ होत आहे. आपणही आयुष्मान भारत योजने अंतर्गत आपल्या परिसरातील गरजू कुटुंबीयांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी केले.