पुणे-मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो तेव्हापासून पतित पावन संघटनेच्या कार्याशी परिचित आहे, कोथरूड हा पतित पावन चा बालेकिल्ला असून संघटनेच्या कार्यास सर्वतोपरी मदत करेन असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.आज त्यांनी शास्त्रीनगर येथे पतित पावन चे उपाध्यक्ष जालिंदर तथा पप्पू टेमगिरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली तेव्हा मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.त्यांच्या समवेत भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर,पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळमकर,पालक मनोज नायर,कार्याध्यक्ष गोकुळ शेलार,विभाग प्रमुख राजू मोहोळ,कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष सुनिल मराठे ,खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष निलेश घारे,शरद देशमुख ( सहसंघटक), अण्णा बांगर\यांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.जागोजागी चंद्रकांतदादांना ओवाळून व त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले.
चंद्रकांतदादांनी एक तासाच्या भेटीत पतित पावन संघटनेच्या सध्याच्या कार्याची माहिती घेतली,तसेच त्या भागातील नागरी समस्या ही समजून घेतल्या.महिला बचत गटाच्या कार्याला त्वरित मदत जाहीर करतानाच कोणत्याही कामासाठी मी सदैव उपलब्ध असल्याचे ही चंद्रकांतदादांनी सांगितले.
श्रीकांत शिळमकर,मनोज नायर,गोकुळ शेलार यांच्याशी विस्तृत संवाद साधताना त्यांनी सर्व अडचणी जाणून घेतल्या.संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिळमकर यांनी संघटनेच्या कार्याची व कार्यकारिणीची माहिती दिली.
पतित पावन संघटनेने मला घडवले असून मी संघटनेचे ऋण कधीच विसरु शकत नाही,जसा एखाद्या स्त्रीला माहेरी गेल्यावर आनंद होतो तसा मला आज माहेरच्या मंडळींना भेटल्याचा आनंद होतो आहे असे पूर्वाश्रमीचे पतित पावन संघटनेचे संदीप खर्डेकर म्हणाले.पतित पावन हा माझ्यासाठी भावनिक विषय असून संघटनेसाठी जे जे शक्य आहे ते ते करण्यास मी कटिबद्ध आहे असेही खर्डेकर म्हणाले.
चंद्रकांतदादा हे सर्वसामान्यांना मदत करताना कधीही हात आखडता घेत नाहीत आणि नागरिकांच्या समस्या ही पाठपुरावा करुन सोडवतात हा माझा अनुभव असल्याने पतित पावन संघटनेने मांडलेले सर्व विषय/प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.माझा सत्कार हा घरचा आहेर असल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली.