पुणे, 13 फेब्रुवारी 2021: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत मुलींच्या गटात अंजली निंबाळकर, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अंजली निंबाळकर हिने सातव्या मानांकित अनन्या देशमूखचा 6-3 असा, श्रावणी देशमुख हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईचा 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. देतिया जैन हिने श्रीया होनकनचा 6-2 असा सहज पराभव केला. मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अद्विक नाटेकर, देव तुराकिया, अर्जुन कीर्तने, अभिराम निलाखे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तरनिकाल: 14वर्षाखालील मुले : उपांत्यपूर्व फेरी: अद्विक नाटेकर(1) वि.वि.अर्णव बनसोडे(7) 6-5(5); देव तुराकिया(4) वि.वि.नील केळकर 6-2; अर्जुन किर्तने(8) वि.वि.अर्जुन परदेशी 6-1;अभिराम निलाखे(2) वि.वि.चिनार देशपांडे(6)6-4;
14वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी: अहाना कौर(1) वि.वि.निशिता देसाई(5) 6-0;देतिया जैन वि.वि.श्रीया होनकन 6-2; अंजली निंबाळकर वि.वि.अनन्या देशमूख(7)6-3; श्रावणी देशमुख वि.वि.देवांशी प्रभुदेसाई(2) 6-1;