पुणे-आज महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची सूत्रे दीपाली प्रदीप धुमाळ यांनी अधिकृतपणे स्वीकारली .यावेळी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर ,शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे ,स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी नितीन कदम, नगरसेवक सचिन दोडके आदी मान्यवर उपस्थित होते .
आज पुणे मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी . दीपाली प्रदीप धुमाळ यांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नियुक्ती केली, नियुक्ती पत्र दिले.यावेळी उप महापौर सरस्वती शेंडगे , सभागृह नेते धीरज घाटे,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासाने, शिवसेनेचे गटनेते श्री पृथ्वीराज सुतार, आमदार सुनील कांबळे, नगरसेवक दिपक पोटे, प्रकाश कदम, बंडू तात्या गायकवाड, उपस्थित होते. हे पत्र दिल्यानंतर त्यांनी यापदाची सूत्रे अधिकृतपणे हाथी घेतली