Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचेही आंदोलन

Date:

पुणे : वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सकाळी कॉंग्रेस ने दांडेकर पुलावर आंदोलन दुपारी संध्याकाळी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी स्वारगेट चौकात बैलगाडी मध्ये दुचाकी ठेऊन  आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्राने तातडीने दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी या भागातील पेट्रोल पंपावर भाजपचा निषेध करण्यासाठी काळया कमळांच्या फुलांचे वाटपही वाहनचालकांना करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्रशासन तसेच राज्यशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे सरकार सामान्य जनतेचे नसुन मुठभर श्रीमंतासाठी काम करणारे असुन पेट्रोल कंपन्यानी हजारो कोटींचा नफा कमावला असुन देखील सरकार भाववाढ कमी करत नाहीये म्हणजेच मोदी सरकारने गोरगरीब जनतेच्या खिशावर टाकलेला हा दरोडाच आहे असा आरोप केला आणि या किमती कमी नाही केल्या तर पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने पुणे शहरातील ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा, शहराध्यक्ष तुपे यांनी यावेळी बोलताना दिला.

पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे , पक्षाच्या महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर यांच्यासह नगरसेविका नंदा लोणकर,  युवक अध्यक्ष राकेश कामठे,सामाजिक न्याय प्रमुख पंडित कांबळे,युवती अध्यक्ष मनाली भिलारे विध्यार्थी अध्यक्ष रीशी परदेशी , चंद्रकांत कवडे,शशिकांत तापकीर, भोलासिंग अरोरा, मिलिंद वालवडकर,
सुकेश पासलकर, राजु गिरे,अशोक राठी, फहिम शेख , सागर भोसले,अझीम गुडाकुवाला, शांतिलाल मिसाळ,शिंल्पा भोसले यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...