राष्ट्रवादी आणि काँग्रेसने हाणून पाडले संपूर्ण 11 दिवसाचे कडक लॉकडाऊन…

Date:

मुख्यमंत्री, प्रशासनाचा ११ दिवस कडक लॉकडाऊनचा होता विचार

मुंबई- राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यासाठी मुख्यमंत्री व राज्य प्रशासन संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत होते. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी विरोध करत अंशत: लॉकडाऊनच्या निर्णयावर तडजोड केली.विकेंड टाळेबंदीचा निर्णय मंत्री बैठकीत एकमुखाने घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. तर काँग्रेसचा टाळेबंदीस विरोध होता, असे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. सरकारने जनतेच्या मागण्या विचारात घेऊन मिनी लाॅकडाऊनचा सुवर्णमध्य काढल्याचे गृहनिर्माण विकास मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ५० हजार, तर मुंबई शहरातील रुग्णसंख्या १० हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. मृत्युदरात झपाट्याने वाढ होत आहे. हे सर्व थोपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य प्रशासन किमान आठ ते ११ दिवस संपूर्ण लॉकडाऊन करावे या भूमिकेत होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. लोकांचे रोजगार पुन्हा जातील, हवे तर निर्बंध कठोर लादा, हाॅटेल, माॅल्स, थिएटर, चाैपाट्या आदी गर्दीची केंद्रे बंद करा, अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. लॉकडाऊनमध्ये जिल्हा वाहतूक बंद होते. परिणामी बाजार समित्या ठप्प होतात. त्यात कृषी मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हवे तर रात्रीची संचारबंदी करा, पण संपूर्ण लॉकडाऊन नको, असा सूर राष्ट्रवादीच्याही मंत्र्यांनी लावला. रविवारची बैठक बैठक व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे झाली. या वेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी तर इतर मंत्री आपापल्या निवासस्थानी किंवा मंत्रालयातील कार्यालयात होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सरकारच्या कठोर निर्बंधांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची विनंती केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...