महापालिकेचे सत्ताधारी आणि प्रशासन यांची दिरंगाई कारणीभूत -दिपाली धुमाळ

Date:

कोरोना रोखण्यासाठी आता तरी पक्षनेत्यांची बैठक घ्या -विरोधीपक्षनेत्यांचे आयुक्तांना आवाहन

पुणे- महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी वेळेवर ज्या ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या त्या केल्या नाहीत त्यांची दिरंगाई महागात पडली आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली .पुणे विभागात ६५ टक्के कोरोनाग्रस्तांची संख्या हि पुण्याची आहे. किमान आता तरी सत्ताधारी भाजपाने एककल्लीपणा सोडून सर्व पक्षनेत्यांची बैठक बोलावून सर्वसंमत उपाययोजना गतीने अंमलात आणाव्यात अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या सौ.दिपाली प्रिदिप धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. फेबुवारीतच कोविड केअर सेंटर आणि जम्बो सेंटर सारख्या सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरु ठेवल्या असत्या तर आज पुण्यावर ओढवलेली स्थिती ओढवली नसती .मात्र या साऱ्या यंत्रणा मार्च अखेरीस अपुऱ्या क्षमतेने सुरु करण्यात आल्या .आणि या एका महिन्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या पाच पटीने वाढली ,आणि ती वाढल्यानंतर सत्ताधारी व प्रशासन उपाययोजना सुरु करू लागले,असा आरोपही त्यांनी केला आहे .

दरम्यान याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहेकी ,’ पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात रोज 6 हजाराच्या वर रुग्णांची संख्या आहे. वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्या च्या मानाने महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती योजना झाल्याचे दिसत नाही.प्रशासन व सत्ताधारी या संबधी अनेक उपाययोजना व निर्णय व धोरण ठरवत आहे. परंतु याला फारसा यश मिळत नाही. उलट अधिकच परिस्थिती गंभीर होत चाललेली दिसत आहे. अनेक ठिकाणी समस्या आहे मग त्या कोर॔नटाईन केलेल्या रूग्णाच्या बाबतीत असतील किंवा बेड्स बाबत असतील. अनेक रुग्ण बेड्स न मिळाल्यामुळे घरीच राहात आहेत. त्यामुळे घरातील लोकांची व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी सुद्धा आम्ही व्हेटिलेटर ,ऑक्‍सिजन बेड वाढवणे व काही उपाय योजना आखणे संबंधित पत्र आपणास दिले होते.तसेच यापूर्वी आम्ही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत किमान एक सी.सी.सी सेंटर सुरू करावा अशी मागणी केली असता त्याची पूर्तता झालेली नाही व तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड्स उपलब्ध होत नाही,त्यामुळे नाहक रुग्णांचा बळी जातो. मुंबई महानगरपालिके प्रमाणे उपायोजना आखल्या गेले आहेत,त्याच धरतीवर आपल्या पुणे महानगरपालिकेने सुद्धा आखाव्यात.या सर्व बाबी अत्यंत चिंताजनक व गंभीर स्वरूपाचे आहेत. यावर उपाय योजना आखण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व पक्षीय नेत्यांबरोबर तातडीने बैठक आयोजित करावी .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...