पुणे- ख्यातनाम अभिनेता नसिरुद्दीन शहा यांनी आज येथे एनएसडी(नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ) आणि एफ टी आय वर ताशेरे ओढले आणि माणसाचे जीवनच त्याला अभिनय शिकवते असे हि प्रतिपादित केले
नसरुद्दीन शाह लिखीत आणि सई परांजपे अनुवादीत ‘आणि मग एक दिवस’… या पुस्तकाचे प्रकाशन आज ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले. पॉप्युलर प्रकाशन व अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या समारंभास ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे,प्रकाशक रमेश राठिवडेकर , पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ याशिवाय ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू, दीपा श्रीराम, रत्ना पाठक – शहा हे मान्यवर प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी यावेळी नसरुद्दीन शाह यांच्याशी मुलाखतीतून संवाद साधला. शहा यांनी देखील त्यांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे देत आपल्या सडेतोडपणाचा परिचय रसिकांना करुन दिला. सुरुवातीला ज्योती सुभाष यांनी पुस्तकाचे अभिवाचन केले . अस्मिता मोहिते यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले . अक्षरधाराच्या रसिका राठीवडेकर यांनी आभार मानले .
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी त्यांची मुलाखत घेतली . पहा या मुलाखतीचा हा काही भाग .. व्हिडीओ …