‘कोण होणार करोडपती’मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर!

Date:

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या  कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते  आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. असा दावा करत’कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या  भागात पद्मश्री अभिनेते ‘नाना पाटेकर’ कर्मवीर म्हणून येणार आहेत.अशी माहिती सोनी मराठी च्या वतीने मायमराठीला कळविण्यात आली आहे.

सोनी मराठी ने पुढे असेही म्हटले आहे कि,’नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता.  त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या  कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत  तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख  रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधी. कर्मवीर विशेष, १७ जुलै, शनिवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गुजरातमध्ये पूरस्थिती; १९ जणांची सुटका, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर

अहमदाबाद / मुंबई | प्रतिनिधी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार...

केके आय इन्स्टिट्यूटचा प्रगत ग्लॉकोमा शस्त्रक्रियांसाठी परिसंवाद संपन्न

पुणे,  पुण्यातील कोरेगाव पार्क येथील केके आय इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच...

खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठ्यात एका दिवसात 0.48 TMC ची वाढ; आवक 480 Mcft वर

पुणे | पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत शनिवारी...

बेकायदा बांधकाम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – माजी उपमहापौरांची पोलिसात तक्रार

संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नाही महापालिकेच्या कामबंदीची नोटीसीला केराची...