शिक्षक दिनानिमित दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने ४८ शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला . भवानी पेठमधील टिम्बर मार्केटजवळील सावित्रीबाई फुले स्मारकमधील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे संयोजन दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद कासम बियाबानी यांनी केले होते . यामध्ये पुणे शहरातील मराठी , उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या ४५ शाळामधील ४५ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी हाजी गुलाम मोहम्मद एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नावर पिरभॉय , महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष अब्दुल रौफ खान , पुणे कॅण्टोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्षप दिलीप गिरमकर , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख , नगरसेवक रविंद्र माळवदकर , शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी , नगरसेवक अतुल गायकवाड , व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
या कार्यक्रमात जे एन पेटिट शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कालरा याना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . तसेच विद्यानिकेतन बाबुभाई प्राथमिक शाळेच्या संस्थापक सौ हसीना अफझल खान याना सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कार व महापालिकेच्या शाळेमधील बशीर अहमद वाहिद खान यांना मौलाना अबुल कलाम आझाद जीवनगौरव पुरस्कार व अंशुल संतोषकुमार रासकर यांनी आशियायी स्पर्धेत आईस स्केटिंग चॅम्पियनशिप मिळाल्याबद्दल त्यांना पुणेरत्न पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . दहावीच्या १०० टक्के निकाल लावणाऱ्या शाळामध्ये गणेश पेठमधील मौलाना मोहम्मद अली जोहर विद्यानिकेतन हायस्कुल या शाळेस प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल सुवर्ण चषक ,दापोडीमधील इकरा हायस्कुल दुसरा क्रमांक म्हणून ढाल , तिसरा क्रमांक बाबाजान चौकाजवळील लेडी हवाबाई मुलींची शाळा याना स्मृतीचिन्ह याना मान्यवर पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला . मॉर्डन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शारदा हगवणे याना आदर्श शिक्षकांच्या काढण्यात आलेल्या लकी ड्रा मध्ये सोन्याची अंगठी देण्यात आली . यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आफताब एंटरटेनमेन्ट ऑर्केस्ट्राद्वारे शिक्षकांचे मनोरंजन केले . पाहुण्यांचे सत्कार व दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीचा कार्याची माहिती अहवालाद्वारे वाहिद कासम बियाबानी यानी दिली .
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष अब्दुल रौफ खान यांनी सांगितले कि , शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षक पुरस्कारांमध्ये पुण्यामधील शिक्षकांचा समावेश केला जाईल , उर्दू साहित्य अकादमीच्या वतीने उत्कृष्ट संस्था व शिक्षक यामध्ये पुणे शहराला प्राधान्य देण्यात येईल .