पुणे : उद्या (मंगळवार) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर अथर्वशीर्ष या सामूहिक पठणासाठी हजारो महिला भाविकांचा सहभाग असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या पहाटे पाचपासून कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला आहे अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना कळविली आहे . वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुण्यातील वाहतूक व्यवस्थेतील तात्पुरते बदल पुढीलप्रमाणे :
1. शिवाजी रस्ता : जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक
पर्यायी मार्ग : गाडगीळ पुतळा–जिजामाता चौकातून डावीकडे वळून गणेश रस्त्याने फडके हौद चौक–देवजीबाबा चौकातून उजवीकडे वळून हमजेखान चौक–तेथून महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौक आणि उजवीकडे वळून गोटीराम भौय्या चौक–तेथून डावीकडून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाता येईल.
2. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक
पर्यायी मार्ग : कन्या शाळेकडून अप्पा बळवंत चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजमार्ग गाडगीळ पुतळा चौक–तेथून उजवीकडे वळून जिजामाता चौकातून वरीलप्रमाणे जाता येईल.
3. लक्ष्मी रस्त्यावर विजय मारुती चौक, सोन्या मारुती चौकापासून आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येईल.
पर्यायी मार्ग : सोन्या मारुती चौकातून डावीकडे वळून सुभानशहा दर्गा उजवीकडे वळून गोटीराम भैय्या चौक मंडईमार्गे शनिवार चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.