Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सावरकरांचे मराठी भाषेतील योगदान मोलाचे : महापौर मुक्ता टिळक

Date:

पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य जितके महत्वाचे आहे, तितकेच त्यांचे मराठी भाषेतील योगदानही मोलाचे असल्याचे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात ‘महापौर’सारखे अनेक महत्वाचे शब्द सावरकरांनी सुचविले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असणार्‍या महापौर टिळक यांनी आज महाविद्यालयातील वसतिगृहात सावरकरांचे वास्तव्य असणार्‍या खोलीत जाऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर ग्रंथालयातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन महापौर टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. वसतिगृहाची क्षमता १७५ असून, येणार्‍या शैक्षणिक वर्षात त्याचे काम पूर्ण होईल.

पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र वसतिगृहे व अभ्यासिकांची संख्या तुलनेने कमी आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्य देणार असल्याचे, महापौर टिळक यांनी यावेळी सांगितले.

सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, संचालक किरण शाळिग्राम, राम निंबाळकर, महेश आठवले. फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. आर. जी. रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...