Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गुलशन देवय्या मांडणार मराठीत ‘डाव’

Date:

मराठी चित्रपटाचा विषय आणि प्रसिद्धी लक्षात घेता, बॉलीवूडकरांच्या नजरा मराठी सिनेसृष्टीकडे वळलेल्या दिसून येत आहे. दिवसेंदिवस मराठी चित्रपटांची प्रगती वाढत असल्याकारणामुळे अनेक हिंदी कलाकारांनी या मायमराठीत नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे, रसिकांनी देखील त्याला लगेच आपलेसे केले असल्यामुळे, बॉलीवूडकरांचा मराठी चित्रपटातील कल वाढला आहे.
हिंदीत विशेष नाव आणि प्रसिद्धी मिळून देखील, मराठीत पदार्पण करणाऱ्या हिंदी कलाकरांच्या यादीत गुलशन देवय्या या अभिनेत्याचे नाव नव्याने दाखल होत आहे. राम लीला,  शैतान,  तसेच हंटर या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा हा अभिनेता लवकरच ‘डाव’ या मराठी चित्रपटातून झळकणार आहे.
मूळच्या बंगळुरूचा असणाऱ्या गुलशनने या सिनेमासाठी महिनाभर मराठीचे धडे गिरवून घेतले असल्याचे समजते. याद्दल सांगताना गुलशनने सांगितले की, ‘यापूर्वी हंटर या सिनेमात मी मराठीमध्ये काही एक-दोन वाक्य बोललो असेल, पण त्यामुळे मला मराठी बोलता येते असे नव्हते. मात्र, आगामी ‘डाव’ या मराठी सिनेमासाठी मला अस्सलखीत मराठी बोलणे गरजेचे होते, शिवाय या सिनेमाची कथा मला खूप आवडली होती, त्यामुळे भाषेच्या समस्येमुळे चित्रपट नाकारण्याची रिस्क मी घेतली नाही, त्यापेक्षा महिनाभर मराठीचे प्रशिक्षण घेणे मला योग्य वाटले. अर्थात मुंबईतील मराठी वातावरणात मी राहिलो असल्यामुळे, हि भाषा अवगत होण्यास जास्त वेळ लागला नाही. आता मी चांगल्याप्रकारे मराठी बोलू शकतो’ .
आतापर्यंत बॉलीवूडच्या अनेक दर्जेदार सिनेमाची निर्मिती करणाऱ्या ऑडबॉल मोशन पिक्चर्स प्रस्तुत  ‘डाव’ हा पहिलाच मराठी सिनेमा असून कनिश्क वर्मा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय हिंदी आणि मराठी अशा द्विभाषेमध्ये हा सिनेमा चित्रित झाला असल्यामुळे, तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. टॉनी डिसुजा, नितीन उपाध्याय आणि अमूल मोहन या सिनेमाचे निर्माते आहेत. हिंदीत विशेष कामगिरी बजावणारा गुलशन मराठीत काय ‘डाव’ मांडतोय हे लवकरच कळेल.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...